कलाकार मंडळींबरोबर त्यांचे कुटुंबीयही कायमच चर्चेत असतात. काही कलाकार आपल्या खासगी आयुष्याबाबत फारसं बोलताना दिसत नाहीत. पण काही कलाकार मात्र खासगी आयुष्याबाबत व्यक्त होण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतात. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्याने आता त्याच्या मुलाच्या जन्माबाबत भाष्य केलं आहे.

आणखी वाचा – स्वयंपाक करताना जिनिलीया देशमुख तेलाचा वापरच करत नाही, स्वतःच केला खुलासा, म्हणाली, “तेलाऐवजी मी…”

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. या मालिकेमधील जयदीप या पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. अभिनेता मंदार जाधव जयदीप हे पात्र साकारतो. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. नुकतंच मंदारने त्याच्या मुलाच्या सहाव्या वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन केलं होतं.

रिदानच्या वाढदिवसाच्या पार्टीला अनेकांनी हजेरी लावली होती. याच पार्टीनिमित्त ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये मंदारने त्याचा मुलगा रिदानच्या जन्माचा एक किस्सा सांगितला. मंदार म्हणाला, “रिदानचा जन्म झाल्यानंतर त्याची जी नाळ आहे ती मी कापली. मला अजूनही तो दिवस आठवतो. तो माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण होता.”

आणखी वाचा – तीन वर्षांमध्येच मोडला संसार, आता ४३व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्याने मराठमोळ्या मुलीशी केलं दुसरं लग्न, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“रिदान व माझा दुसरा मुलगा रिहानचीही नाळ मीच कापली. मी ऑपरेशन थिएटरमध्ये होतो. मी आणि माझ्या पत्नीने एकमेकांचा हात पकडला होता. दोघांची नाळ मी स्वतः कापली आणि एवढं मोठं काम माझ्या हातून झालं यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.” मंदार एक सुंदर क्षण यावेळी सगळ्यांसह शेअर केला.