छोट्या पडद्यावरील ‘म्हणजे नक्की काय असतं’ ही लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतून अभिनेता मंदार जाधव घराघरात पोहोचला. मंदार या मालिकेत जयदीपची भूमिका साकारत आहे. मंदार सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.

मंदारने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या सेटवरील हा व्हिडीओ आहे. शूटिंगदरम्यान मंदार व गिरिजा प्रभू पूर्णपणे भिजल्याचं दिसत आहेत. मंदारने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो बुटामधील पाणी हातात असलेल्या चहाच्या कपमध्ये टाकत आहे. त्यानंतर तो चहाचा कप मंदारने तोंडाला लावल्याचंही दिसत आहे.

हेही वाचा>> Video: “आपलीच हवा…” भलं मोठं पोस्टर, गाडीवर मिरवणूक अन्…; शिव ठाकरेसाठी अमरावतीत चाहत्यांची रॅली

हेही वाचा>> “माझा हात हातात घेऊन शाहरुख खान…”, सायली संजीवने सांगितलेला ‘तो’ किस्सा

मंदारचा हा व्हिडीओ पाहून खरंच तो कपातील चहा प्यायला का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी तशा कमेंटही केल्या आहेत. पण मंदार बुटातील पाणी मिक्स केलेला चहा प्यायला नसून फक्त अभिनय केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही त्याने तसं लिहिलं आहे. शिवाय त्याने कमेंटमध्येही चाहत्यांना रिप्लाय दिला आहे. मंदारचा हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही पाहा>> Photos: नवरा-नवरी, डोली, सनई-चौघडे अन्…; वनिता खरातच्या हातावर रंगली सुमितच्या नावाची मेहेंदी, पाहा खास फोटो

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंदारने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या तो ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.