Sukh Mhanje Nakki Kay Asta Fame Jaydeep Gauri : ‘स्टार प्रवाह’च्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने जवळपास ४ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेल्या वर्षाच्या अखेरीस सर्वांचा निरोप घेतला. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका ऑगस्ट २०२० मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. यामध्ये गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव या कलाकारांनी मध्यवर्ती भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेत गिरीजाने साकारलेली ‘गौरी’ आणि मंदारने साकारलेला ‘जयदीप’ ही दोन्ही पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. सध्या या दोघांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे जाणून घेऊयात…

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम जयदीप आणि गौरी मालिका संपल्यावर अवघ्या १ महिन्यातच पुन्हा एकदा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर परतले आहेत. जयदीप-गौरी पुन्हा एकत्र येण्यामागे एक खास कारण आहे. ‘स्टार प्रवाह’वर येत्या ९ फेब्रुवारीला दोन लोकप्रिय मालिकांचा महासंगीत सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने सध्या दोन्ही मालिकांच्या टीमकडून जय्यत तयारी सुरू आहे. कारण, या महासंगीत सोहळ्यात अनेक मालिकांचे कलाकार एकत्र येऊन परफॉर्मन्स सादर करणार आहेत.

“संपूर्ण परिवार होणार गोळा, एकत्र साजरा होतोय आमचा महासंगीत सोहळा…” असं कॅप्शन देत वाहिनीने या सोहळ्याची खास झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे आणि यामध्ये प्रेक्षकांना जयदीप-गौरीची झलक पाहायला मिळाली आहे. ‘ठरलं तर मग’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या दोन्ही मालिकांचा मिळून एकत्र महासंगीत सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यासाठी खास ३ तासांच्या विशेष भागाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा विशेष भाग ९ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित केला जाईल.

जयदीप-गौरी या महासंगीत सोहळ्यात खास डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहे. दोघांनीही यावेळी Twinning केल्याचं पाहायला मिळतंय. गौरीने फिकट निळ्या रंगाची साडी, तर जयदीपने सुद्धा त्याच रंगाचा कुर्ता घातला होता.

View this post on Instagram

A post shared by Ultra_Marathi Buzz (@ultra_marathibuzz)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या दोन्ही मालिकांच्या महासंगीत सोहळ्यात नवीन काय ट्विस्ट येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.