‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर २०२०ला सुरू झालेली मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ आता लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. नुकताच मालिकेने ९०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार पडला. असं असताना दुसऱ्याबाजूला सातत्याने प्रेक्षक वर्ग मालिका बंद करण्याची मागणी करत आहेत. मालिकेतील नवनवीन ट्वीस्ट प्रेक्षकांच्या रटाळवाणे वाटतं आहेत. पण अशातच आता मालिकेत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. लवकरच ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मालिका २५ वर्षांची लीप घेणार आहे. याचा जबरदस्त प्रोमो नुकताच समोर आला आहे.

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने गायली श्रेया घोषालने गायलेली अंगाई, कलाकार मंडळीसह चाहत्यांनी केलं कौतुक

‘स्टार प्रवाह’च्या सोशल मीडियावर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मालिकेची कथा २५ वर्ष पुढे गेल्याचं पाहायला मिळत आहे. आता मालिकेत गौरी-जयदीपचा पुनर्जन्म होणार आहे. जयदीपचा अधिराज म्हणून पुनर्जन्म होणार आहे, तर गौरीचा नित्या म्हणून पुनर्जन्म पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – विराट कोहलीने केलं ४९वे वनडे शतक; अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “स्वतःच्या वाढदिवसाला…”

मालिकेच्या प्रोमोमध्ये सुरुवातीला माई मशाल हाती घेऊन अंबाईच्या मंदिरात जाताना दिसत आहेत. त्यानंतर माई मंदिरात जाऊन जयदीप आणि गौरीच्या पुनर्जन्मासाठी साकडं घालताना पाहायला मिळत आहेत. त्या म्हणणात, “डोळे उघडं अंबाई. डोळे उघडं. २५ वर्ष झोपलीस गं तू. माझ्या जयदीप-गौरीवर अन्याय झाला. त्या निरागस जीवाचा अंत झाला. तू असशील सत्वाची तर घडवशील चमत्कार अन् देशील माझ्या जयदीपला जन्म नवा. व्हय तू काळ भेदून आणशील माझ्या गौरीला पुन्हा या भूमीवर अन् करशील सफल त्यांची अधुरी प्रेम कहाणी. जाग अंबे, जाग…” या प्रोमोमध्ये जयदीप म्हणजेच अधिराज रांगडा शेतकरी दाखवला आहे. तर गौरी गावंढळ नाही तर सुशिक्षित नित्या दाखवली आहे.

हेही वाचा – ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मालिकेने मारली बाजी; निर्माती शर्मिष्ठा राऊत झाली भावुक, म्हणाली, “मी आणि तेजसने…”

हेही वाचा – Video: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील लोकप्रिय अभिनेत्याची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत एंट्री; पाहायला मिळणार महत्त्वाच्या भूमिकेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सध्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका रात्री ९.३० प्रसारित होत आहे. पण आता २० नोव्हेंबरपासून गौरी-जयदीपची पुनर्जन्माची कथा रात्री १० वाजता पाहायला मिळणार आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या वेळेत ईशा केसकर आणि अक्षर कोठारी यांची मालिका ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.