स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सातत्याने चर्चेत आहे. या मालिकेत शिर्के कुटुंबाचा अंत दाखवून मालिकेने २५ वर्षांचा लीप घेतला आहे. त्यामुळे आता यात गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा पाहायला मिळत आहे. या नव्या ट्वीस्टमुळे प्रेक्षकांकडून मालिकेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता नुकतंच या मालिकेने एक रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

या मालिकेत जयदीप हे पात्र साकारणारा अभिनेता मंदार जाधव याने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक फोटो शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
आणखी वाचा : “ताई तू आहेस, पण माझी दादागिरी…”, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने बहिणीला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा, पोस्ट चर्चेत

सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका गेल्या ३ वर्षात रात्री प्रसारित होणाऱ्या मालिकांपैकी सर्वाधिक टीआरपी असलेली मालिका ठरली आहे. त्यामुळे मंदार जाधवने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

“सर्व रसिक प्रेक्षकांचे खूप खूप आभार. असच प्रेम करत रहा”, असे कॅप्शन त्याने दिले आहे. “#सुखंम्हणजेनक्कीहेचअसतं”, असा हॅशटॅगही त्याने दिला आहे.

आणखी वाचा : Video : “बाबा सलग ३३ वर्षे…”, मुग्धा वैशंपायनचे वडील झाले सेवानिवृत्त! गायिकेने शेअर केले भावनिक क्षण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मंदारच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. अभिनेता अभिजीत खांडेककरने “अभिनंदन भावा”, अशी कमेंट केली आहे. त्याबरोबर त्याच्या पोस्टवर अनेक चाहते कमेंट करत मालिकेतील कलाकारांचे अभिनंदन करताना दिसत आहेत.