टीव्ही सीरियल ‘इमली’मध्‍ये फहमान खान आणि सुंबूल तौकीर खानची जोडी खूप पसंत केली गेली होती. शोमध्ये दोघांचा ट्रॅक संपल्यानंतर सुंबुल बिग बॉस 16 मध्ये सहभागी झाली आहे, तर फहमान देखील त्याच्या आगामी मालिकेच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच फहमान सुंबुलला सपोर्ट करण्यासाठी बिग बॉसच्या घरात गेला होता. सुरुवातीला तो शोमधील पहिला वाइल्ड कार्ड स्पर्धक असल्याचं म्हटलं गेलं. पण नंतर तो फक्त सुंबुलला सपोर्ट करण्यासाठी आणि त्याच्या आगामी मालिकेचं प्रमोशन करण्यासाठी बिग बॉसमध्ये गेल्याचं कळालं.

हेही वाचा – “तिला माझी गरज….”; अपूर्वा नेमळेकरशी मैत्रीबाबत समृद्धी जाधव स्पष्टच बोलली

बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर फहमान खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने सुंबुलने दिलेल्या भेटवस्तूबद्दल सांगितलं आहे. घरातून बाहेर पडताना फहमानचं सामान पॅक होतं, परंतु सुंबुलने त्याच्यासाठी व्हॅनिटी किटमध्ये तिचं ब्रेसलेट एका पत्रासह पाठवलं होतं. सुंबुलची ही खास भेट आपल्या चाहत्यांना दाखवताना फहमान आनंदी आणि भावूकही दिसत होता. या व्हिडिओवर सर्व चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुंबुल तौकीर शालीन भानोतबद्दल पझेसिव्ह झाली असल्याचं म्हटलं जात होतं. या मुद्द्यावरून बराच गोंधळ झाला आणि याच दरम्यान फहमानची घरात एंट्री झाली. त्यामुळे घरात नवीन ट्विस्ट पाहायला मिळेल, असं प्रेक्षकांना वाटत होतं, पण तसं झालं नाही. फहमान बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला. गेल्या काही दिवसांत सुंबुलला तिच्या वडिलांनी टीना आणि शालीनबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर टीनाची आई व सुंबुलच्या वडिलांमध्येही वाद झाल्याचं पाहायला मिळालं.