छोट्या पडद्यावरचे कलाकार एखादी मालिका संपली तरीही घराघरांत लोकप्रिय असतात. ‘कलर्स मराठी वाहिनी’वरील अशीच एक मालिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. २०२० मध्ये कलर्स मराठी वाहिनीवर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका प्रसारित केली जायची. मालिकेमधील प्रत्येक पात्राने अगदी सुरुवातीपासूनच सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ३१ ऑगस्ट २०२० मध्ये या मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला आणि हळुहळू यामधील लतिका घराघरांत लोकप्रिय झाली.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेत लतिकाचं पात्र अभिनेत्री अक्षया नाईकने साकारलं होतं. वैविध्यपूर्ण भूमिका साकरून ती नेहमीच प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. गेल्यावर्षी ‘सुंदरा…’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर अक्षयाने रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. आता लवकरच ती एका नव्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा : “तेव्हा माझं करिअर संपेल”, सलमान खानने ३४ वर्षांपूर्वी लिहिलेलं ‘ते’ पत्र व्हायरल; चाहत्यांना म्हणाला होता…

अभिनेत्री अक्षया नाईक सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. तिने इन्स्टाग्रामवर नुकताच तिच्या आगामी प्रोजेक्टच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे. अक्षया पॉकेट एफएमच्या ‘एक लडकी को देखा तो’ या नव्या सीरिजमध्ये झळकणार आहे. याच सीरिजच्या शूटिंगदरम्यानचा हा फोटो आहे. यामध्ये अक्षयाने गरोदर असल्याचा लूक केला आहे. परंतु, तिचे चाहते हा फोटो पाहून सुरुवातीला काहीसे गोंधळले.

हेही वाचा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळेचा स्विमिंग पूलमधला फोटो पाहून चाहते म्हणतात, “आईसाहेब मारतील…”

“अभिनंदन अक्षया”, “तू लग्न केव्हा केलंस?” अशा अनेक कमेंट्स तिच्या फोटोवर करण्याच आल्या होत्या. तर, तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती असलेल्या तिच्या चाहत्यांनी अभिनेत्रीची बाजू देखील स्पष्ट केली होती. आता यावर स्वत: अक्षयाने कमेंट्समध्ये स्पष्टीकरण दिलं आहे. “मित्रांनो कृपया कोणतेही निष्कर्ष काढू नका. हा माझ्या सेटवरचा आणि मी साकारत असलेल्या भूमिकेच्या लूकचा फोटो आहे” असं लिहून पुढे तिने हसायचे इमोजी जोडले आहेत.

latika
अक्षया नाईकच्या फोटोवरील कमेंट्स

हेही वाचा : “मागे लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा फोटो पाहिला अन्…”, अभिनय बेर्डेसाठी क्षितीज पटवर्धनची पोस्ट; म्हणाला, “बरीच मुलं वारसा घेतात, याने…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षयाचे चाहते तिला पुन्हा एकदा नव्या भूमिकेत झळकताना पाहून आनंद व्यक्त करत आहेत. अभिनेत्रीने याआधी सुद्धा अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.