मागचं वर्ष बऱ्याच कलाकार मंडळींसाठी खास ठरलं आहे. काहींना मागच्या वर्षामध्ये जोडीदार मिळाला. तर काही कलाकार आई-बाब झाले. बॉलिवूडप्रमाणेच मराठी कलाकारदेखील यात मागे नाहीत. कलर्स मराठी’ वाहिनीवरील मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेता हृषिकेश शेलारच्या घरी आता एका पाहुणीचे आगमन होणार आहे.

हृषिकेशने त्याच्या पत्नीसह फोटो शेअर करत बाबा होणार असल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याने आपल्या पत्नीबरोबर प्रेग्नंसी फोटोशूटही केलं होत. हृषिकेशला मुलगी झाली असून त्याने बाळाचा फोटो शेअर करत माहिती दिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे “इट्स बेबी गर्ल , माझी जण फिलिंग बाप” असा कॅप्शन दिला आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सुंदरा मनामध्ये भरली’मध्ये हृषिकेश दौलत हे नकारात्मक पात्र साकरतो. त्याच्या या भूमिकेवर प्रेक्षक प्रचंड प्रेम करतात. हृषिकेशची पत्नी स्नेहा काटेही एक उत्तम अभिनेत्री आहे. स्नेहा ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील अभिनेत्री काजल काटेची बहिण साकारली होती.