scorecardresearch

Premium

Video: “उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी आहेत? अजित पवार की देवेंद्र फडणवीस?” स्पष्ट उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

‘खुपते तिथे गुप्ते’च्या आगामी भागात खासदार सुप्रिया सुळे पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Supriya sule

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय असलेल्या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते.’ काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पर्वाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर, आता नुकताच या पर्वाच्या आगामी भागाचा एक प्रोमो समोर आला आहे.

या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे अशा अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. तर, आगामी भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्या राजकारण आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल दिलखुलासपणे संवाद साधताना दिसतील. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी आहे, याचं उत्तर त्यांनी या भागात दिलं आहे.

bhagwant maan
पंजाबचे मुख्यमंत्री नव्या भूमिकेत; केंद्र आणि शेतकऱ्यांच्या चर्चेत मध्यस्थ म्हणून भगवंत मान यांची महत्त्वपूर्ण भूमिका
Madhya Pradesh Congress
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनंतर आता मध्यप्रदेशचे माजी सीएम कमलनाथही भाजपाच्या वाटेवर? राजकीय चर्चांना उधाण!
Sandeep Deshpande on BJP Meet
राज ठाकरे महायुतीला पाठिंबा देणार? मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं? देशपांडे म्हणाले, “हिंदुत्त्ववादी विचारांचे…”
Vinod Tawde Nitish Kumar (2)
“…म्हणून नितीश कुमार आमच्याबरोबर आले”, बिहारचे भाजपा प्रभारी विनोद तावडेंनी सांगितल्या पडद्यामागच्या घडामोडी

आणखी वाचा : “किती वाईट दिवस आलेत गुप्तेवर…”, ‘खुपते तिथे गुप्ते’वर प्रेक्षक नाराज, अवधूतला ट्रोल करत म्हणाले…

‘खुपते तिथे गुप्ते’ या पर्वाच्या आगामी भागाचा एक प्रोमो नुकताच सोशल मीडियावर आला आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांना अवधूत गुप्ते काही प्रश्न विचारताना दिसत आहे. त्यादरम्यान अवधूतने सुप्रिया सुळे यांना विचारलं, “उपमुख्यमंत्री म्हणून कोण जास्त प्रभावी आहे? अजित पवार की देवेंद्र फडणवीस?” तर त्यावर उत्तर देत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “अर्थात, अजित पवार.” त्यांनी दिलेल्या या उत्तरानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा : Video: “कोणीतरी विष कालवलं…,” उद्धव ठाकरेंबरोबरचे जुने फोटो बघताच राज ठाकरे भावुक, म्हणाले…

दरम्यान, या प्रोमोनं या आगामी भागाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’चा हा नवीन भाग प्रेक्षकांना येत्या रविवारी पाहायला मिळेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule revealed who is more effective deputy chief minister of maharashtra rnv

First published on: 14-09-2023 at 10:17 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×