scorecardresearch

Premium

“किती वाईट दिवस आलेत गुप्तेवर…”, ‘खुपते तिथे गुप्ते’वर प्रेक्षक नाराज, अवधूतला ट्रोल करत म्हणाले…

आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

Avadhoot

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय ठरलेला अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. परंतु या मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये फक्त राजकारण्यांनाच बोलवलं जातं असं म्हणत काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांनी या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली. परंतु आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे अशा अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. तर आगामी भागामध्ये राजकारणी अभिजीत बिचुकले पाहुणे म्हणून उपस्थिती लावताना दिसणार आहेत. परंतु त्यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं प्रेक्षकांना चांगलंच खटकलं आहे.

aboli
Video: “एक व्हीलचेअरवर बसलेली मुलगी…,” ‘अबोली’ मालिकेचा नवा प्रोमो पाहून नेटकरी हैराण, म्हणाले…
hrishikesh shelar
Video: नवरा असावा तर असा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’तील ‘अधिपती’च्या वागण्यावर भारावले प्रेक्षक, जाणून घ्या कारण
girija oak
Video: “हजार साल के गुलामी के पीछे…” विवेक अग्निहोत्रींच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये मराठमोळ्या अभिनेत्रीचा बेधडक अंदाज, म्हणाली…
tejashri pradhan (2)
“तेजश्री प्रधान खूप…” लोकप्रिय गायिकेने केला अभिनेत्रीच्या स्वभावाबद्दल खुलासा, म्हणाली…

आणखी वाचा : “उद्धव साहेबांची खुर्ची गेली तेव्हा तुम्हाला काय वाटलं?” राज ठाकरेंनी दिलं स्पष्ट उत्तर, म्हणाले…

या कार्यक्रमाच्या पुढील भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. यामध्ये पुढील भागात अभिजीत बिचुकले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट झालं. या प्रोमोमध्ये ते त्यांच्या हटके शैलीत अवधूत गुप्तेशी संवाद साधताना दिसत आहेत. परंतु या प्रोमोला प्रेक्षकांची नापसंती मिळताना दिसत आहे.

हेही वाचा : शिरीष यांच्याबद्दल घरी सांगताच ‘अशी’ होती वंदना गुप्तेंच्या वडिलांची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “तो पहिल्यांदा घरी आला आणि…”

या प्रोमोवर एका नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलं, “अर्रर…किती वाईट दिवस आले आहेत गुप्तेवर.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “कार्यक्रमाचा दर्जा घालवू नका.” तिसऱ्याने लिहिलं, “डोक्यावर पडले आहेत का झी वाले!?” तर आणखी एक कमेंट करत म्हणाला, “गुप्ते तुम्ही शो सोडून द्या…” त्यामुळे आता चॅनलला आणि अवधूत गुप्तेला नेटकरी ट्रोल करू लागले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Avadhoot gupte gets trolled for calling abhijeet bichukle on khupte tithe gupte show rnv

First published on: 05-09-2023 at 18:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×