Suraj Chavan Bigg Boss Marathi Winner : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण ठरला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील घराघरांतून त्याला तुफान पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे यंदाच्या पर्वात सूरज बाजी मारणार हे जवळपास निश्चित झालं होतं. परंतु, तुम्हाला माहितीये का अनेक अडचणींवर मात करून सूरजने हे यशाचं शिखर गाठलं आहे. त्याचा आतापर्यंतचा प्रवास जाणून घेऊयात…

सूरज चव्हाण मूळचा बारामतीचा आहे. त्याच्या गावाचं नाव मोढवे असं आहे. आधी टिकटॉक अन् आता इन्स्टाग्रामवरील रील्समुळे सूरज प्रसिद्धीझोतात आला. त्याचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला होता. लहानपणीच त्याच्या आई-वडिलांचं निधन झालं. त्यामुळे मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.

हेही वाचा : Bigg Boss Marathi 5 चा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंतची पहिली पोस्ट; म्हणाला, “मला जे वाटतंय ते…”

सूरजने याबद्दल ‘बिग बॉस’च्या ( Bigg Boss Marathi ) घरात सांगितलं होतं. तो म्हणाला होता, “माझ्या घरातली परिस्थिती प्रचंड वाईट होती. माझ्या वडिलांना कॅन्सर झाला. वडिलांचं त्यामध्ये निधन झालं आणि या सगळ्या धक्क्यातून माझी आई सावरू शकली नाही. या तणावामुळे तिला वेड लागलं…आईला रक्ताच्या उलट्या होत होत्या. तिला खूप त्रास व्हायचा…ती पूर्ण खचून गेली होती. माझी आई अन् आजी एकाच दिवशी वारल्या.”

सूरजच्या घरात आत्या आणि पाच सख्ख्या बहिणी आहेत. याशिवाय सुरुवातीला अनेक लोकांनी फसवणूक केली मात्र, हळहळू या सगळ्यातून मार्ग काढत यशाचा हा टप्पा गाठल्याचं सूरजने ‘बिग बॉस’च्या घरात सांगितलं होतं.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ९ लाख घेऊन जान्हवीने घेतली घरातून एक्झिट! बाहेर येताच पती किरण किल्लेकर म्हणाले, “तू आमच्यासाठी… “

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Suraj Chavan Bigg Boss Marathi Winner
Suraj Chavan Bigg Boss Marathi Winner ( सूरज चव्हाणचा संघर्षमय प्रवास )

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस’साठी दिलेला नकार

सूरजने सुरुवातीला ‘बिग बॉस’साठी ( Bigg Boss Marathi ) नकार दिला होता. मात्र, त्यानंतर टीमने तसेच ‘एन्डमोलशाईन इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोजेक्ट हेड’ केतन माणगांवकर यांनी त्याच्याशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधून त्याला हा संपूर्ण गेम, याचा फॉरमॅट समजावून सांगितला होता. तेव्हा कुठे सूरज तयार झाला. आधी ट्रेनिंग घेऊन तो या घरात सहभागी झाला होता आणि आज तो विजेता होऊन या घराच्या बाहेर आला आहे.