Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वापासून सूरज चव्हाण हे नाव घराघरांत लोकप्रिय झालं आहे. मोढवे गावच्या या ‘गुलीगत किंग’ने सुरुवातीला शोसाठी नकार दिला होता. मात्र, ‘बिग बॉस’ची टीम त्याची मनधरणी करण्यात यशस्वी ठरली आणि सूरज शोमध्ये सहभागी झाला. पहिल्या दिवसापासून जसं त्याला घरातील अन्य सदस्यांनी समजून घेतलं अगदी त्याचप्रमाणे होस्ट रितेश देशमुखने सुद्धा सूरजला कायम पाठिंबा दिला.

सूरज ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यावर रितेशने त्याच्याबरोबर एक खास सेल्फी शेअर करत शुभेच्छा दिल्या होत्या. याशिवाय आगामी चित्रपटांमध्ये काम करताना सूरजची आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी रितेश त्याला वैयक्तिक मॅनेजर देखील देणार आहे असं सूरजने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. आता शो संपल्यावर यामधले सगळे सदस्य आपआपल्या कामावर परतले आहेत. अगदी सूरज सुद्धा आधीसारखा Reel व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या एका व्हिडीओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : अक्षय कुमारच्या २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘या’ सिनेमाचा येणार सिक्वेल, चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होताच निर्मात्यांनी केली घोषणा

सूरज चव्हाण नुकताच रितेश देशमुखच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकला आहे. या गाण्यात त्याचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळत आहे. त्याने या व्हिडीओमध्ये ‘वेड’ चित्रपटातल्या “मला वेड लावलंय…” या गाण्यावर डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून सूरजला रितेशची आठवण येत असल्याच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सूरजचा या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेला सुरज भाऊ…”, “सूरज आता लग्न कर”, “सूरज चव्हाण लय भारी”, “रितेश दादांची आठवण येतेय वाटतं” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी सूरजच्या व्हिडीओवर केल्या आहेत.

हेही वाचा : ‘प्रेमाची गोष्ट’मधून लोकप्रिय अभिनेत्याची एक्झिट! आता हर्षवर्धनच्या भूमिकेत झळकणार ‘हा’ कलाकार, मालिकेत आहे मोठा ट्विस्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सूरज चव्हाणच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्याचं बालपण केलं आहे. आई-बाबांचं निधन झाल्यावर त्याचा सांभाळ बहिणींना केला. सूरजचं शिक्षण फक्त आठवीपर्यंतच पूर्ण झालं आहे. त्यामुळे त्याला अनेक व्यावहारिक गोष्टींचं ज्ञान नाहीये. मात्र, आता त्याला अनेक लोक पाठिंबा देऊन वैयक्तिक कामात त्याची मदत करत आहेत. सूरजच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल सांगायचं झालं, तर लवकरच तो केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमात झळकणार आहे.