Premachi Goshta : छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये नेहमीच नवनवीन ट्विस्ट येत असतात. काही मालिका मर्यादित भागांमध्ये संपवल्या जातात. तर, काही मालिकांचं प्रसारण वर्षानुवर्षे सुरू असतं. एकदा मालिका सुरू झाली की, त्यात अनेक बदल होतात. कलाकारांच्या रिप्लेसमेंट, नव्या कलाकारांची एन्ट्री, जुन्या कलाकारांची एक्झिट या गोष्टी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना अगदी सहजरित्या पाहायला मिळतात.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ( Premachi Goshta ) या मालिकेतून काही दिवसांपूर्वी मिहिकाचं पात्र साकारणार्‍या मृणाली शिर्केने एक्झिट घेतली होती. आता त्यानंतर जुन्या हर्षवर्धनने देखील ही मालिका सोडली आहे. हर्षवर्धन हे पात्र मालिका सुरू झाल्यापासून अभिनेता यश प्रधानने साकारलं होतं. मात्र, आता त्याच्याजागी एक नवीन अभिनेता प्रेक्षकांना ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत झळकताना पाहायला मिळत आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम स्वप्नील राजशेखर खरं आडनाव का लावत नाहीत? ‘राजशेखर’ नावामागे आहे रंजक गोष्ट, वाचा…

हर्षवर्धन हा सावनीचा एक्स बॉयफ्रेंड आणि सध्या मालिकेत मिहिकाचा नवरा असल्याचं पाहायला मिळत आहे. गेले अनेक दिवस सगळे एपिसोड सागर, मुक्ता आणि सावनी यांच्याभोवती फिरत होते. पण, आता लवकरच मिहिकामुळे मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. सध्या मिहिकाची भूमिका अभिनेत्री अमृता बने तर हर्षवर्धनच्या भूमिकेसाठी अभिनेता अनिरुद्ध हरिपची वर्णी लागली आहे.

हर्षवर्धनच्या भूमिकेत आता झळकणार ‘हा’ अभिनेता

अनिरुद्धने यापूर्वी छोट्या पडद्यासह अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात हर्षवर्धनच्या भूमिकेसाठी अनिरुद्धची एन्ट्री झाल्याचं प्रेक्षकांसमोर आलं आहे. यावेळी मिहिका आणि हर्षवर्धन दोघेही एकमेकांशी वाद घालत असतात हे सगळं दूर उभी असलेली सावनी बघत असते. यावेळी मिहिका ती गरोदर असल्याचं सांगते. यामुळे सावनीला मोठा धक्का बसतो.

हेही वाचा : “महेशने विचारलं टक्कल करशील का? मी लगेच…”, सविता मालपेकरांनी सांगितला ‘काकस्पर्श’चा किस्सा, म्हणाल्या…

Premachi Goshta
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत हर्षवर्धनच्या भूमिकेत नवीन अभिनेता ( Premachi Goshta )

आता मिहिका आई होणार असल्याची बातमी मुक्ता आणि सागरपर्यंत गेल्यावर त्यांची यावर काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, तेजश्री प्रधान व राज हंचनाळे यांच्या मुख्य भूमिका या मालिकेत ( Premachi Goshta ) आहेत. त्यांच्यासह यामध्ये अमृता बने, अपूर्वा नेमळेकर, संजीवनी जाधव, शुभांगी गोखले, ईशा परवडे, कोमल सोमारे गजमल हे कलाकार देखील सहाय्यक भूमिका साकारत आहेत.

Story img Loader