अभिनेता सुयश टिळकनं विविध मालिका, नाटकं, चित्रपटांमधून काम केलं आहे. त्यानं आपल्या अभिनयानं मराठी मनोरंजनसृष्टीत एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी सुयश एक आहे. त्यानं बऱ्याच मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘का रे दुरावा’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. या मालिकेत सुयशनं साकारलेल्या जयराम या भूमिकेला प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळाला होता. आता सुयश पुन्हा एकदा नव्या भूमिकेत प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी आला आहे.

हेही वाचा – Video: सुकन्या मोनेंनी लंडनमध्ये ‘इंद्रधनुष्य’च्या टीमसाठी बनवली गरमागरम कांदाभजी; स्वप्नील जोशी म्हणाला…

अलीकडेच बंद झालेल्या ‘लोकमान्य’ मालिकेतही सुयश टिळक झळकला होता. या मालिकेत त्यानं वासुदेव बळवंत फडके ही महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर सुयश ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘जीवाची होतिया काहिली’ या मालिकेत एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. आता पुन्हा एकदा तो वेगळ्या मालिकेतून वेगळ्या भूमिकेत दिसला आहे.

हेही वाचा – Video: अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचं केलं कौतुक, म्हणाली, “खरंच…”

‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘जाऊ नको दूर … बाबा’ या मालिकेतून सुयश प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या मालिकेत सुयश डॉ. नचिकेतच्या भूमिकेत झळकला आहे. याबाबत त्यानं स्वतः सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

हेही वाचा – ‘तुम्ही तुमचं खरं नाव का लावत नाही?’ चाहत्याच्या प्रश्नावर ऐश्वर्या नारकर म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुयशनं शेअर केलेल्या पोस्टच्या खाली चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत, त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच त्याचं काम आवडतं असल्याचंही सांगत आहेत. एका नेटकरीनं लिहिलं आहे की, ‘नचिकेत अभिनय सुंदर … सर्वांत गोड बाबा.’ तर दुसऱ्या नेटकरीनं लिहिलं आहे, “सुयश छान भूमिका, छान अभिनय. तुझा सहज अभिनय आम्हाला नेहमीच आवडतो.”