देशभरात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. महाराष्ट्रात पुणे, जळगाव, शिर्डी या भागात आज मतदान होत आहे. मराठी कलाविश्वातील बऱ्याच कलाकारांनी आज त्यांचा मतदानाचा हक्क बजावला आहे. याचे बरेच फोटो कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. परंतु, मतदानासाठी सकाळीच घराबाहेर पडलेल्या मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता सुयश टिळकला काहीसा वेगळा अनुभव आला. यासंदर्भातील पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘का रे दुरावा’ मालिकेमुळे अभिनेता सुयश टिळक घराघरांत लोकप्रिय झाला. या मालिकेत त्याने जयराम ही भूमिका साकारली होती. मराठी कलाविश्वातील विविध मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे. नुकताच तो ‘अबोली’ मालिकेत झळकला होता. आज सकाळीच मतदानासाठी निघालेल्या सुयशला नेमका काय अनुभव आला जाणून घेऊयात…

हेही वाचा : “अगं अगं जाऊबाई…”, ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम जानकी-ऐश्वर्याची रंगली जुगलबंदी, पुण्यात पार पडलं केळवण

सुयश पोस्ट शेअर करत लिहितो, “गेल्यावेळी मतदान केलं तेव्हा नावात चूक होती. त्यावेळी ती चूक सुधारायचा अर्ज दिला होता. यावेळी सुदैवाने ऑनलाईन पोर्टलवर खूप शोधल्यावर शेवटी नाव सापडलं असताना त्याच पुन्हा तीच चूक होती.”

अभिनेता पुढे म्हणतो, “वोटिंग बूथला सकाळी ७ वाजता पोहोचलो. माझ्या ऑनलाईन पोर्टलवरच्या यादीतील नाव नोंदीपेक्षा त्याजागी बूथवर असलेल्या यादीत मात्र वेगळंच नाव आढळलं. म्हणून ३ तास वेगवेगळ्या बूथवर जाऊन नाव शोधायचा प्रयत्न केला. अचानक यावेळी काही जणांचा मतदार संघच बदलला आहे ते समजलं, म्हणून वेगळ्या मतदार संघात पण चौकशी केली शोधाशोध केली.”

“गेली अनेक वर्ष मी मतदान न चुकता करत आलो आहे, यावेळी मला तो हक्क बजावता आला नाही. कोणत्याही इतर पर्यायाने देखील मतदान करू दिले नाही या खंत वाटते आणि वाटत राहील.” अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्याने घडल्या प्रकाराबद्दल खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा : “तुझ्याशिवाय एक दिवसही…”, हार्दिक जोशीची अक्षयासाठी रोमँटिक पोस्ट, राणादाने ‘असा’ साजरा केला बायकोचा वाढदिवस

View this post on Instagram

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुयशने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट्समध्ये “ज्यांचे नाव यादीत नाही असे सगळे लोक मतदान केंद्रावर form no 17 भरून आणि आपले voting कार्ड दाखवून मतदान करू शकणार आहेत.” तर, दुसऱ्या एका युजरने “सुयश भाऊ आज मला पण खूप वाईट अनुभव आला.” असं म्हटलं आहे. याशिवाय इतर काही नेटकऱ्यांनी अभिनेत्याला पुन्हा एकदा जाऊन संबंधित बूथवरील प्रक्रिया पूर्ण करून मतदान करावं असा सल्ला दिला आहे.