‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा टेलीव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय शो… या शोची चाहत्यांमध्ये अजूनही लोकप्रियता आहे. हा शो आणि शोमधील प्रत्येक कलाकार कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत राहत असतात. अशातच गेल्या वर्षी या शोमधील एका अभिनेत्रीने मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये मिसेस सोढी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने असितकुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. याबद्दल जेनिफरने अनेक मुलाखतींमधून तिच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, अशातच नुकत्याच एका मुलाखतीत तिला या सगळ्याचा मानसिक त्रास झाल्याचंही तिने सांगितलं.

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत जेनिफरने तिच्या भवन व्यक्त केल्या. यावेळी अभिनेत्री असं म्हणाली, “असितजींनी माझ्या घरी नोटीस पाठवली की जेनिफरला आम्हाला तिचे पैसे द्यायचे नाहीत. ५ एप्रिल २०२५ हा दिवस होता, आजही तो दिवस माझ्या आठवणीत आहे. कारण – ज्यादिवशी माझ्याकडे ही नोटीस आली, त्याच्या काही दिवस आधीच माझी बहीण आयसीयुमध्ये अॅडमिट झाली होती. त्या काळात मला खूप दु:ख झालं होतं.”

यापुढे जेनिफर म्हणाली, “माझी बहीण ‘स्पेशल चाइल्ड’ असल्याने आधीच तिच्या अनेक गरजा पूर्ण झाल्या नव्हत्या. तिला तिच्या आयुष्यात कधीच कोणती गोष्ट मिळाली नाही. मी गरोदर असताना माझे वडील गेले, त्यानंतर माझी आई एकटी पडली. त्यामुळे बहीणीची जबाबदारी तिच्यावर पडली होती. ती फक्त माझेच ऐकायची. असित मोदींकडून मला नोटीस आली होती आणि त्यामुळे मी अक्षरश: तुटले.”

यानंतर तिने सांगितलं, “तारक मेहता का उल्टा चष्मा’ शो शोनंतर माझ्याशी अनेकांनी बोलणं बंद केलं. त्यामुळे या काळात मी खूप मानसिक अवस्थेतून जात होते. या सगळ्याला कंटाळून मी देवाला म्हटलं की, देवा माझ्याबरोबर हे काय घडत आहे. मला मालिकेमधून काढलं गेलं, माझे पैसे नाही दिले. माझ्या भावाचे निधन झाले, आईची तब्येत बिघडली.”

याप्रकरणी असितकुमार मोदी यांनी जेनिफर यांची थकित रक्कम आणि पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र ते पैसे अजूनही जेनिफरला अद्याप मिळाले नसल्याचंही तिने या मुलाखतीत सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जेनिफर मिस्त्री बन्सीवाल प्रसिद्ध टीव्ही शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील श्रीमती सोढीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे आणि तिने या शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचा आरोप केल्यावर ती प्रकाशझोतात आली. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने गेल्या वर्षी असित कुमार मोदी, सोहिल रमाणी आणि जतिन रमाणी यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.