TMKOC Fame Dilip Joshi: टीव्ही मालिकांमुळे प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन होते. विविध जॉनरचे कार्यक्रम टीव्हीवर दररोज प्रदर्शित होतात. विनोदी, भयपट, गुन्हेगारीवर आधारित अनेक कार्यक्रम पाहायला मिळतात. या कार्यक्रमांना प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळते.

दररोज प्रदर्शित होणाऱ्या मालिका प्रेक्षकांच्या रोजच्या जीवनाचा अभिवाज्य भाग बनतात. काही मालिका वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. त्यापैकी एक म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका आहे. या मालिकेत एक गोकुळधाम सोसायटी दाखवली गेली आहे. या सोसायटीमध्ये विविध राज्यांतील कुटुंबे राहतात. त्यांच्या जगण्याभोवती, त्यांच्या सुख-दु:खाभोवती मालिकेची कथा फिरताना दिसते.

जेठालालच्या डान्सचा व्हिडीओ होतोय व्हायरल

सोसायटीमधील एका व्यक्तीवर संकट आले तरी सर्व जण मदतीला धावून येतात. एखाद्या सदस्याच्या गोंधळ घालण्यामुळे अनेक गमतीजमतीही घडतात. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करते.

या मालिकेत जेठालाल ही भूमिका अभिनेते दिलीप जोशी यांनी साकारली आहे. त्यांची भूमिका गाजली. आता जेठालाल म्हणजे दिलीप जोशी हे प्रेक्षकांसाठी समीकरण बनले आहेत. आता दिलीप जोशी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

हा व्हिडीओ व्हायरल भयानीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जेठालाल म्हणजे दिलीप जोशी गरबा खेळताना दिसत आहेत. या व्हिडीओमधील त्यांची ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत. एकाने लिहिले की, जेठालालपासून सर्व ट्रेंडची सुरुवात होते. आणखी एका लिहिले की, आमचा आवडता कलाकार आहे; तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. दिलीप जोशी यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते.

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. १७ वर्षे पूर्ण झाल्यानंतर या सोसायटीमध्ये एका नवीन राजस्थानी कुटुंबाची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. मालिकेत सतत नवीन काहीतरी घडताना दिसते. त्यामुळे प्रेक्षकांना नेहमी मालिकेत पुढे काय होणार, ही उत्सुकता लागून राहिल्याचे दिसते.

दरम्यान, १७ वर्षांनंतरही आजही ही मालिका टीआरपीमध्ये इतर मालिकांना मागे टाकत बऱ्याचदा अव्वल स्थानी असल्याचे पाहायला मिळते.