‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. प्रेक्षकही सुरुवातीपासून या मालिकेवर भरघोस प्रेम करत आहेत. ही मालिका जितकी चर्चेत असते तितकेच या मालिकेतील कलाकार मंडळी चर्चेत असतात. नुकतंच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील एका अभिनेत्रीने वयाच्या २६व्या वर्षी दुसरी आलिशान गाडी खरेदी केली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिधवानीने तिच्या वाढदिवसा दिवशी आलिशान गाडी खरेदी केली आहे. याचा व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा – “इंडस्ट्रीत लेखक मिळत नाहीत आणि जे आहेत त्यांना मान मिळत नाही”, चिन्मय मांडलेकरने व्यक्त केली खंत, म्हणाला…

“मनापासून कृतज्ञ”, असं कॅप्शन लिहित पलकने नव्या गाडीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत नवी गाडी खरेदी करताना पलकसह तिच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. यामध्ये पलक म्हणतेय, “मी दुसरी गाडी खरेदी केली आहे. हां, ही जास्त महाग नाहीये. पण खूप खास आहे. आईला रुपटॉप पाहिजे होतं आणि बाबांना मोठी गाडी. भावाला व मला आई-वडिलांचा आनंद पाहिजे होता. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात फक्त यांना आनंदी ठेवू इच्छिते. धन्यवाद.”

हेही वाचा – तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ आणि स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेचं आहे खास कनेक्शन, जाणून घ्या…

पलकच्या या व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. “तुझा खूप अभिमान वाटतो”, “अभिनंदन”, अशा अनेक प्रतिक्रिया पलकच्या व्हिडीओवर चाहत्यांनी दिल्या आहेत.