‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला लवकरच १५ वर्षे पूर्ण होणार आहेत. ही छोट्या पडद्यावर सर्वाधिक काळ सुरू असलेली लोकप्रिय मालिका आहे. ‘तारक मेहता…’ मालिकेचे प्रेक्षक गेल्या काही वर्षांपासून मालिकेत दयाबेनच्या पुनरागमनाची आणि टप्पू सोनूला केव्हा मागणी घालणार? याची आतुरतेने वाट पाहत होते. दयाबेन मालिकेत पुन्हा कधी येणार याबाबत काही माहिती नसली, तरी टप्पू आणि सोनूची प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : ‘नयनतारा’बद्दल एका शब्दात काय सांगशील? शाहरुख म्हणाला, “ती अतिशय…”

गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सचिव आत्माराम तुकाराम भिडे यांची एकुलती एक कन्या सोनूला तिचा बालपणीचा मित्र टप्पू प्रपोझ करणार आहे. या संदर्भातील व्हिडीओ ‘तारक मेहता’ मालिकेच्या अधिकृत पेजवर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दाखविल्याप्रमाणे टप्पू हातात गुलाब घेऊन सोनूला प्रपोझ करत असतो, तेवढ्यात सोनूचे वडील भिडे गुरुजी तिथे येतात आणि टप्पूच्या हातातून गुलाब हिसकावून घेतात.

यानंतर भिडे थेट जेठालालच्या घरी पोहोचतात आणि घडलेल्या प्रसंगाची माहिती बापूजी आणि जेठालाल या दोघांना देतात. आत्मारामचे बोलणे ऐकून बापूजी आणि जेठालाल यांना धक्काच बसतो. यानंतर जेठालाल टप्पूला म्हणतो, “तू आमच्यासमोर सोनूला हवे तेवढे गुलाब दे.” यानंतर भिडे गुरुजी आणि जेठालालमधील वाद या प्रोमोमध्ये दाखवण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘Rodies’च्या शूटिंगला ब्रेक! प्रिन्स नरुलाने रिया चक्रवर्तीला दिली धमकी, दोघांमध्ये टोकाचे वाद?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे. अनेक यूजर्सना असे वाटते की, दरवेळेप्रमाणे या वेळीही भिडे गुरुजी स्वप्न बघत असणार, तर काहींचे म्हणणे आहे की, शोचा घसरलेला टीआरपी पाहता निर्मात्यांनी हा ट्विस्ट आणला आहे.