‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचा चाहतावर्ग मोठा आहे. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आता याच मालिकेमधील एक सुप्रसिद्ध कलाकार पुढल्या वर्षी बोहल्यावर चढणार आहे. अभिनेता तनुज महाशब्दे लवकरच लग्न करणार आहे. वयाच्या ४२व्या वर्षी तनुजने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा – अभिनेत्री रिया कुमारीची गोळ्या झाडून हत्या, पतीबरोबर प्रवास करताना घडली घटना

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये अय्यर हे पात्र साकारणार तनुज अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. बबिता व अय्यरची जोडी छोट्यापडद्यावरील सुपरहिट जोडी ठरली. पण खऱ्या आयुष्यात मात्र तनुज अविवाहित आहे. आता लवकरच तो लग्न करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

‘आजतक’च्या वृत्तानुसार, २०२३मध्ये तनुज लग्न करणार आहे. तनुज कोणत्या मुलीबरोबर लग्न करणार? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मध्यंतरी त्याचं नाव बबिता हे पात्र साकारणाऱ्या मुनमुन दत्ताशी जोडलं गेलं. तनुज व मुनमुन एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा बऱ्याच रंगल्या. तनुजची होणारी पत्नी मुनमुनपेक्षाही सुंदर असल्याचं बोललं जात आहे.

आणखी वाचा – वडील विलासराव देशमुखांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट करणार का? रितेश देशमुख म्हणाला “भविष्यात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण मध्यंतरी दिलेल्या मुलाखतींमध्ये दोघांनी रिलेशनशिपच्या चर्चा खोट्या असल्याचं म्हटलं होतं. इतकंच नव्हे तर तनुजनेही त्याच्या लग्नाच्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं होतं. आता पुन्हा एकदा तनुजच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.