‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत तारक मेहताची भूमिका करणाऱ्या शैलेश लोढा यांनी १४ वर्षे काम केल्यानंतर मालिका सोडली. मालिका सोडल्यानंतर त्यांनी निर्मात्यांवर आरोप केले होते आणि थकबाकी मिळाली नसल्याची तक्रार NCLT कडे केली होती. या तक्रारीनंतर दोन्ही पक्षाच्या संमतीने हे प्रकरण निकाली काढण्यात आलं. याबद्दल बोलताना “ही लढाई पैशासाठी कधीच नव्हती. ती न्याय आणि स्वाभिमानासाठी होतील. मी ही लढाई जिंकली आहे आणि सत्याचा विजय झाला आहे, त्याचा मला आनंद आहे,” असं शैलेश म्हणाले होते. यावर आता निर्माते असित मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘तारक मेहतां’नी जिंकला असित मोदीविरोधातील खटला; शैलेश लोढांना मिळेल कोट्यवधींची थकबाकी, म्हणाले, “ही लढाई…”

असित मोदी म्हणाले, “शैलेश लोढा यांनी खटला जिंकल्याचा खोटा दावा केला आहे. ते खटला जिंकले असं म्हणणं चुकीचं आहे. कारण न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे की ते प्रकरण संमतीने निकाली काढण्यात आलं होतं. ते खोटं का बोलत आहेत, यामागचा त्यांचा हेतू समजण्यात आम्ही अक्षम आहोत. त्यांनी तथ्ये चुकीच्या पद्धतीने लोकांसमोर मांडली नाही तर बरं राहील.”

समीर वानखेडेंनी सांगितली जुळ्या मुलींची नावं आणि नावामागची गोष्ट; म्हणाले, “आत्याला कॅन्सर झाला होता अन्…”

मोदी पुढे म्हणाले, “कोणत्याही कलाकाराने शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, काही कागदपत्रांवर त्यांनी स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. ज्यावरून ते आता शोचा भाग नाहीत असं कळतं. ही एक स्टँडर्ड प्रक्रिया आहे आणि त्याचे पालन प्रत्येक कलाकार करतो. शैलेश यांनी औपचारिकता पूर्ण करण्यास आणि एग्झिट कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. आम्ही कधीही पेमेंट देण्यास नकार दिला नाही किंवा वादही घातला नाही. एग्झिट लेटरमधील अटींमध्ये काही समस्या असल्यास आम्ही त्यांच्याशी मीटिंगसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी उत्तर दिलं नाही आणि NCLT (नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल) कडे त्यांच्या थकबाकीची मागणी केली.”

प्रॉडक्शन हाऊसचे प्रोजेक्ट हेड सोहिल रमाणी म्हणाले, “फेब्रुवारी २०२२ मध्ये शैलेशनी एकदा ईमेल केला होता की ते शोमधून बाहेर पडत आहेत, मात्र, दुसऱ्याच दिवशी ते सेटवर होते. शेवटी ते अचानक शोमधून बाहेर पडले. फक्त शैलेश यांच्या बाबतीतच नव्हे तर कोणत्याही कलाकारासाठी रिलिव्हिंग लेटरवर सही करणे आवश्यक आहे.”

अधिकारी असून अभिनेत्रीशी लग्न कसं जमलं? समीर वानखेडे म्हणाले, “मी क्रांतीला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असित म्हणाले, “त्यांनी १४ आमच्यासोबत काम केलं, ते आमच्यासाठी एक कुटुंब होते. त्यांच्या सुरुवातीच्या काळात आम्ही त्यांना कामाच्या पलीकडेही पाठिंबा दिला. त्यांना कामाचा मोबदलाही वेळेवर दिला गेला. ते शोचा भाग असताना त्यांनी कधीच तक्रार केली नाही. मात्र, बाहेर पडल्यावर त्यांच्या वागण्याने आम्ही दु:खी झालो. त्यांची थकबाकी रोखण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता परंतु नंतर प्रत्येक कॉर्पोरेटमधून बाहेर पडण्याची औपचारिकता पूर्ण करणे आवश्यक आहे.”