‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो आहे. या शोने लोकांना खूप हसवले आणि आजही प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील व्यक्तीरेखाही तेवढ्याच लोकप्रिय आहेत. जवळपास १३ वर्षे सुरू असलेल्या या शोमधील सर्वच व्यक्तोरेखांचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. यापैकीच एक म्हणजे चंपक चाचा.

चंपक चाचा म्हणजेच अमित भट्ट ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’च्या सर्वात आवडत्या पात्रांपैकी एक आहेत. ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये ते त्यांच्या पत्नीबरोबर दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांना ट्रोल करत होते.

आणखी वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’तील ‘चंपक चाचा’ यांना मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान गंभीर दुखापत, निर्माते काळजीत

हा व्हिडीओ पाहून अमित गुटखा खातात असं अनेकांना वाटू लागलं. अशातच या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये एका नेटकाऱ्याने त्यांना याबद्दल थेट प्रश्न विचारला. “तुम्ही गुटखा खाता का ?” असं त्याने अमित यांना विचारलं. त्याच्या या कमेंटवर अमित यांनीही उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं, “हो”.

हेह वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील ‘भिडे’ एका एपिसोडसाठी आकारतात ‘इतके’ मानधन, आकडा ऐकून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांच्या या उत्तराने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेकांनी अमित भट्ट यांच्यावर गुटखा खाण्याबद्दल टीका केली आणि यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर समस्यांचीही जाणीव करून दिली. अनेकांनी त्यांना डेंटिस्टला दात दाखवण्याचा सल्लाही दिला. आता त्यांच्या या उत्तराने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.