Shivani Sonal Talks About Mother In Law : शिवानी सोनार मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती ‘झी मराठी’वरील ‘तारिणी’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेतील कामासाठी तिचं अनेकांकडून कौतुकही होत आहे. अभिनेत्रीने नुकतीच ‘झी मराठी अवॉर्ड २०२५’ या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावलेली. यावेळी तिने तिच्या सासुबाईंबद्दल सांगितलं आहे.
‘झी मराठी अवॉर्ड २०२५’ या पुरस्कार सोहळ्यादरम्यान अनेक कलाकारांनी धमाल किस्से सांगितले आहेत. अशातच शिवानीनेही तिच्या सासुबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिला लहानपणी तुला कोणाच्या हातचा एक असा पदार्थ जो खूप आवडायचा, याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “मला माझ्या आत्याच्या हातची पुरण पोळी खूप आवडते.”
शिवानी सोनारला सासुबाईंच्या हातचा आवडतो ‘हा’ पदार्थ
शिवानी पुढे म्हणाली, “आता माझं नवीन लग्न झालं आहे. माझ्या सासुबाईंच्या हातचा स्टॉबेरीखंड. त्या स्टॉबेरीखंड खूप छान करतात, ते मला फार आवडतं.” शिवानी पुढे म्हणाली, “मला पुरणपोळी आणि तूप हे समीकरण खूप आवडतं आणि आईच्या हातचे सगळे गोड पदार्थ खूप आवडतात.”
शिवानी व अंबर गणपुळे यांनी जानेवारी २०२५ मध्ये लग्नगाठ बांधलेली. या दोघांच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावलेली. त्यावेळी त्यांच्या लग्नातील फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झालेले. दोघांनीही साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना हा सुखद धक्का दिला होता. शिवानी व अंबर यांची भेट एका शॉट फिल्मच्या निमित्ताने झाल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
शिवानी व अंबर दोघेही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय कलाकार असून शिवानी खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली ते ‘कलर्स मराठी’वरील ‘राजा रानीची गं जोडी’ या मालिकेतून. यामधील तिच्या भूमिकेतून तिने प्रेक्षकांची मनं जिंकलेली, तर अंबरने ‘स्टार प्रवाह’वरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत आदित्य ही भूमिका साकारलेली. त्यानंतर तो लोकमान्य टिळक यांच्या जीवनावर आधारित मालिकेत झळकलेला.
दरम्यान, शिवानी सध्या ‘तारिणी’ मालिकेत मुख्य भूमिका साकारत असून यामध्ये तिच्याबरोबर इतरही अनेक लोकप्रिय मराठी कलाकार पाहायला मिळत आहेत.