‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या जोरदार सुरू आहे. मुक्ता-सागरच्या लग्नामुळे मालिका चर्चेत आली आहे. सईच्या प्रेमाखातर लग्नाला तयार झालेले मुक्ता-सागर लवकरच आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. पण त्यापूर्वी मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सावनीच्या तमाशानंतर मुक्ता सागरबरोबर लग्न मोडणार असल्याचं पाहायला मिळणार आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागामध्ये मुक्ता-सागरच्या लग्नाचे विधी सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. नवरदेवाला वाजत-गाजत लग्न मंडपात आणलं. पण त्यानंतर मुक्ताच्या आईने बन्जो बंद करायला सांगितला आणि सनई-चौघडे वाजवायला सांगून सागरचं स्वागत केलं. मुक्ताची मावशी आणि आईने सागरसह कोळी कुटुंबाचं औक्षण केलं. यानंतर मुक्ताच्या वडिलांनी सागरचा हात हातात घेऊन त्याला लग्न मंडपात आणलं. दुसरीकडे मुक्ता बोहल्यावर चढण्यासाठी सुंदर नेटलेली पाहायला मिळाली. पिवळ्या रंगाच्या नऊवारीत तिचं सौंदर्य अक्षरशः खुलून आलेलं होतं. मंडपात लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली. तितक्यातचं अर्जुन-सायलीची एन्ट्री झाली. हे पाहून सागरला खूप आनंद झाला. अर्जुन सागरचा बालपणीचा मित्र असतो. तर सायली ही देखील मुक्ताची चांगली मैत्रीण असते असं दाखवण्यात आलं आहे.

हेही वाचा – छगन भुजबळांच्या पहिल्या सिनेमातून सविता मालपेकरांना काढलं होतं, किस्सा सांगत म्हणाल्या, “रंजना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजच्या भागामध्ये मंगलाष्टके सुरू असतानाच सागरची पूर्वाश्रमीची बायको सावनीची एन्ट्री होणार आहे. सावनी सई व्यतिरिक्त अजून एक ११ वर्षाचा मुलगा असल्याचं सत्य मुक्ता समोर आणणार आहे. शिवाय सागरने त्या मुलाला कशाप्रकारे मारलं असे अनेक खुलासे भर मंडपात करणार आहे. त्यामुळेच आता मुक्ता लग्नाला नकार देताना पाहायला मिळणार आहे. मुक्तासह संपूर्ण कुटुंब मंडपातून निघून जाताना दिसणार आहे. पण मुक्ता-सागरचं लग्न होण्यासाठी अर्जुन-सायली मध्यस्थी करणार आहेत. सायली मुक्ताला सागरबरोबर लग्न करण्यासाठी समजवताना पाहायला मिळणार आहे. पण सायलीचं म्हणणं मुक्ता ऐकणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.