‘स्टार प्रवाह’च्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या मुक्ता-सागरचा धुमधडाक्यात लग्नसोहळा सुरू आहे. गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजानुसार लग्नसोहळा करायचं ठरलं असलं तरी कोळी पद्धतीने देखील समारंभ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी मुक्ता-सागरचा साखरपुडा आणि मेहंदीचा सोहळा पार पडला. सध्या संगीत सोहळा सुरू आहे. पण लवकरच मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेच्या कालच्या भागात मुक्ता-सागरच्या संगीत सोहळ्याला सुरुवात झाली. ‘अबोली’ मालिकेतील अबोली आणि ‘लग्नाची बेडी’मधील मधुराणी यांच्या कथ्थक नृत्याने संगीतला सुरुवात झाली. त्यानंतर मुक्ताच्या वडिलांनी ‘दाटून कंठ येतो’ हे गाणं गायलं. ज्यामुळे मुक्ता भावुक झाली. आतापर्यंत या संगीत सोहळ्यात अबोली, मधुराणी आणि ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील आनंदी-सार्थकची एन्ट्री झाली आहे. आज ‘पिंकीचा विजय असो’मधील पिंकी-युवराज एन्ट्री होणार आहे. त्यानंतर अनेक सरप्राईज डान्स होणार आहेत. ज्यामुळे गोखले कुटुंबाला आश्चर्याचा धक्काच बसणार आहे.

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: संगीत सोहळ्यातील इंद्रा-जयंत यांचा सरप्राईज डान्स पाहून मुक्ता-सागरमध्ये होणार वाद, नेमकं काय घडणार? वाचा…

पण या संगीत सोहळ्यानंतर सावनीला मुक्ता दुसऱ्या कोणाशी नाही तर सागरशी लग्न करत असल्याचं सत्य कळतं. ज्यामुळे तिला मोठा धक्काच बसतो. मुक्ताने तिला फसवलं असं वाटू लागतं. त्यामुळे आता मुक्ता-सागरच्या लग्नसोहळ्यात मिठा खडा पडणार आहे. सावनी-हर्षवर्धन या लग्नात मुक्तासमोर सागरचा खरा चेहरा आणणार आहेत. सागरला फक्त एकटी सई नसून त्याला एक मुलगा आहे, जो हॉस्टेलला असल्याचा खुलासा सावनी मुक्ता आणि गोखले कुटुंबीयांसमोर करणार आहे. तसंच सागरबद्दल अनेक गोष्टी ती मुक्ताला सांगणार आहे.

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली, म्हणाला, “गेल्या आठ वर्षांपासून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, सावनीच्या या गौप्यस्फोटोमुळे मालिकेत पुढे नक्की काय घडणार? मुक्ता लग्नासाठी तयार होणार की नकार देणार? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.