Premachi Goshta: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका टीआरपीच्या यादीतही अव्वल स्थानावर आहे. या मालिकेतील मुक्ता, सागर, सावनी, सई, इंद्रा कोळी अशा सगळ्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत घर निर्माण केलं आहे. आता लवकरच मालिकेत मुक्ता विरुद्ध सावनी असं चित्र पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – सिद्धू मुसेवालाची ५८ वर्षांची आई जुळ्या मुलांना देणार जन्म? वडिलांनी पोस्ट करत सांगितलं सत्य, म्हणाले…

‘सीरियल जत्रा’ या इन्स्टाग्राम पेजवर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पुढील भागात काय घडणार? याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सावनी मुक्ताला चॅलेंज देताना दिसत आहे. सावनी म्हणते की, मी सगळ्यांसमोर मुक्ता तुला चॅलेंज देते. तू स्वतःला मॉडेल म्हणवते ना. मग तिने सगळ्यांसमोर मला कम्पिट करावं. जर ती जिंकली तर मी स्वतःहून माघार घेईल. पण जर का मी जिंकले तर तिने या ऑफिसमध्ये कधी पाऊल ठेवायचं नाही. यानंतर सागर सावनीने दिलेलं चॅलेंज स्वीकारतो.

हेही वाचा – मुक्ता-सागरची जोडी झाली सायली-अर्जुनपेक्षा वरचढ, टीआरपीमध्ये यादीत ‘प्रेमाची गोष्ट’ अव्वल

सध्या मालिकेत नेमकं काय सुरू आहे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सागरच्या कंपनीला एका उत्पादनासाठी एका मॉडेलची गरज असते. यामध्ये हर्षवर्धनची भागीदारी असल्यामुळे तो सावनीचं नाव मॉडेल म्हणून सुचवतो. पण सागरला ते मान्य नसतं. तो मुक्ताला विचारणा करतो. पण मुक्ता तयार नसते. मात्र अखेर कंपनीच्या संचालक मंडळाच्या मिटिंगला येऊन मुक्ता मीच मॉडेल असल्याचं सांगते. यामुळे सागरला खूप आनंद होतो. पण आता सावनीने दिलेलं चॅलेंज मुक्ता जिंकते का? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.