‘स्टार प्रवाह’ वरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये सध्या धामधूम सुरू आहे. सागर-मुक्ताचा लग्नसोहळा पाहायला मिळत आहे. साखरपुडा, मेहंदी, संगीत, हळद हे समारंभ झाले असून आता लवकरच सागर-मुक्ता लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. यासाठी गोखले-कोळी कुटुंबाने जय्यत तयारी केली आहे. गोखले कुटुंबाच्या रितीरिवाजाप्रमाणे लग्न पार पडणार असणार असलं तरी या लग्नात कोळी ठसकाही पाहायला मिळणार आहे. लग्न मंडपात वाजत-गाजत सागर आणि त्याच्या कुटुंबाचं आगमन होणार आहे. संपूर्ण कुटुंब कोळी पेहरावात दिसणार आहे. अशातच सागर-मुक्ताच्या लग्नाचा BTS व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये लग्नाचे सीन शूट करतानाची सेटवरची धमाल, मस्ती पाहायला मिळत आहे.

सागर म्हणजे अभिनेता राज हंचनाळेच्या इन्स्टाग्राम पेजवर BTS व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लग्नाच्या मंडपापासून ते रुखवतापर्यंत सर्व काही पाहायला मिळत आहे. तसेच सई, मुक्ता, सागर आणि इतर कलाकार लग्नाचा सीन हसत-खेळत शूट करताना दिसत आहेत. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडीओत मालिकेच्या लेखिका अश्विनी शेंडे पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – अमित भानुशाली तेजश्री प्रधानची आहे जुनी ओळख, तर जुईचं आहे ‘हे’ खास नातं; वाचा यांच्या ऑफस्क्रीन बॉन्डविषयी…

हेही वाचा – Premachi Goshta: “पैशाचा म्हावरा, रुपयाचा मसाला…”, सागर-मुक्ताच्या लग्नानिमित्ताने अर्जुन-सायलीने घेतले जबरदस्त उखाणे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सागर-मुक्ताच्या लग्नासोहळ्यातील आतापर्यंतचे समारंभ निर्विघ्नपणे पार पडले असले तरी आता मात्र ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मंगलाष्टका सुरू असतानाच सावनी पहिल्या मुलाचं सत्य मुक्तासमोर उघडं करणार आहे. सागरने त्याला कशी वागणूक दिली याविषयी भरमंडपात सांगणार आहे. त्यामुळे आता हे सत्य समोर आल्यानंतर मुक्ता सागरबरोबर लग्न करायला तयार होते की नाही? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.