Nivedita Saraf commented on Tejashri Pradhan Post: नवीन मालिका प्रदर्शित होणार असतील, तर प्रेक्षकांनादेखील त्याविषयी मोठी उत्सुकता असते. विशेष म्हणजे आपल्या आवडत्या कलाकारांच्या मालिका असतील, तर प्रेक्षक आतुरतेने अशा मालिकांची वाट पाहत असतात.

आता लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच एका मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘वीण दोघांतली ही तुटेना’, असे या मालिकेचे नाव आहे. त्यामध्ये तेजश्री प्रधानसह अभिनेता सुबोध भावे झळकणार आहे. झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रदर्शित होणार आहे.

तेजश्री प्रधानने शेअर केली पोस्ट

काही दिवसांपूर्वीच झी मराठी वाहिनीने या मालिकेचा टीझर प्रदर्शित केला होता. त्याला प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. तेजश्रीने विविध फोटो पोस्ट करीत या मालिकेबाबत चाहत्यांना माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच तिने मालिकेचा मुहूर्त पार पडल्यानंतर काही फोटो शेअर केले होते. आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.एका बसथांब्यावरील हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. हा बसथांबा होणार सून मी या घरची मालिकेतदेखील पाहायला मिळाला होता.

हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिलेले, “ज्या जागांनी तुमच्या मनात माझ्यासाठी जागा निर्माण केली, त्या जागी जाऊन पुन्हा एकदा तुम्ही दिलेल्या प्रेमाच्या आठवणींना जाग आली. पुन्हा एकदा तुमच्या मनात तिची जागा निर्माण करण्यासाठी, एक नवीन पात्र, नव्या उमेदीनं जगण्यासाठी सज्ज झाले आहे.”

पुढे अभिनेत्रीने लिहिले, “स्वानंदी सरपोतदारला लवकरच भेटूयात. आशीर्वाद असू द्या”, असे म्हणत तेजश्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

निवेदिता सराफ काय म्हणाल्या?

अभिनेत्रीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. मात्र, यातील एक कमेंट लक्ष वेधून घेत आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी, “माझी खात्री आहे की, तू ही भूमिका उत्तम साकारशील. ऑल द बेस्ट”, अशी कमेंट करीत तेजश्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. निवेदिता सराफ आणि तेजश्रीने अग्गंबाई सासूबाई या मालिकेत एकत्र काम केले होते.

तर चाहत्यांनीदेखील तेजश्रीचे कौतुक केले आहे. “सौंदर्य आणि साधेपणाचं अद्वितीय संमेलन”, “तुझ्या मालिकेची खूप वाट पाहत आहोत. आमचा सारखा प्रेक्षकवर्ग फक्त तुझ्यासाठी मालिका बघायला सुरुवात करतो”, “साधेपणातच सुंदरता आणि सौंदर्य आहे. तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही यापूर्वी कोणताही प्रकल्प अपूर्ण ठेवला नाही. तुम्ही कारणाशिवाय जाणार नाही. तथापि, हे वर्ष पूर्ण व्हावे आणि तुमचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध व्हावे, अशी मी प्रार्थना करतो”, “दिवसेंदिवस उत्सुकता चालली आहे. तुम्हाला टेलिव्हिजनवर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे”, अशा अनेक कमेंट्स करीत तेजश्रीला शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेजश्री व सुबोध भावे यांनी हॅशटॅग तदेव लग्नम या चित्रपटात एकत्र काम केले आहे. तसेच याआधी तेजश्री होणार सून मी या घरची या मालिकेत जान्हवी, अग्गंबाई सासूबाई या मालिकेत शुभ्रा या भूमिकांतून तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. या मालिका मोठ्या प्रमाणात गाजल्या होत्या. जान्हवी या भूमिकेने तेजश्रीला नवीन ओळख दिली. तर सुबोध भावे झी मराठी वाहिनीच्या सुबोध भावे या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसले होते. या मालिकेलादेखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता या मालिकेतून या लोकप्रिय कलाकारांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.