‘ठरलं तर मग’ मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. २०२२ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने गेली दीड वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं आहे. टीआरपीच्या शर्यतीत प्रत्येक आठवड्यात ‘ठरलं तर मग’ ही मालिका आघाडीवर असते. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी आणि अभिनेता अमित भानुशाली यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या दोघांनी साकारलेल्या सायली-अर्जुनच्या जोडीला प्रेक्षकांना अल्पावधीतच पसंती दर्शवली आहे. वर्षभर टेलिव्हिजनवर अधिराज्य गाजवल्याने यंदाच्या बहुतांश पुरस्कार सोहळ्यात ‘ठरलं तर मग’ मालिकेचा दबदबा पाहायला मिळाला.

हेही वाचा : श्रीदेवी यांच्या स्मरणार्थ मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या जंक्शनला देणार दिवंगत अभिनेत्रीचं नाव

‘स्टार प्रवाह परिवार’ पुरस्कार सोहळ्यात सुद्धा ‘ठरलं तर मग’ ही वाहिनीची महामालिका ठरली होती. तर, सायली अर्जुनला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार मिळाल होता. अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता अमिता भानुशाली हा मुळचा गुजराती आहे. त्याने यापूर्वी देखील अनेक मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.

हेही वाचा : ‘भैय्याजी’ आहे तरी कोण? मनोज बाजपेयींच्या १०० व्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! बिहारमध्ये होणार जबरदस्त अ‍ॅक्शन

सध्या अमितने शेअर केलेला असाच एक फोटो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये टीव्हीवर ‘ठरलं तर मग’ मालिका सुरू आहे. तर वरच्या बाजूला अमितने यंदाच्या वर्षी जिंकलेले सगळे पुरस्कार रांगेत ठेवण्यात आले आहेत. या फोटोमध्ये एकूण ६ ट्रॉफी नजरेस पडत आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी या अभिनेत्यावर कौतुकचा वर्षाव केला आहे.

“मी शेअर केलेल्या फोटोसाठी बेस्ट कॅप्शन काय असेल? धन्यवाद! ‘स्टार प्रवाह’ मला अर्जुन सुभेदार साकारण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे आभार” असं कॅप्शन देत अमितने पुरस्कारांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर नेटकऱ्यांनी असंख्य कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : Video : गुलाबी रंगाचा ड्रेस, टिकली, मोत्याची माळ अन्…; प्रसाद ओकच्या लाडक्या श्वानाचा वाढदिवसानिमित्त खास लूक

View this post on Instagram

A post shared by Amit Bhanushali (@aamit.bhanushali)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अर्जुन सुभेदारच्या भूमिकेला तू खऱ्या अर्थाने न्याय दिलास, आम्हाला हे पात्र खूप आवडतं”, “तू स्टार आहेस”, “अर्जुन सर तुमच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे हे पुरस्कार”, “प्रेक्षकांची पोचपावती वाटते नेहमीच गोड अजून काय पाहिजे जर असेल बक्षीसाची जोड” अशा प्रतिक्रिया अमित भानुशालीच्या फोटोवर आल्या आहेत.