Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत वात्सल्य आश्रमाच्या केसचा ट्रॅक सुरू असून, प्रियाचा खोटेपणा उघड करण्यासाठी अर्जुन-सायली नवनवीन प्लॅन्स आखत असल्याचं पाहायला मिळत आहे.

मालिकेत कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं गुपित सर्वांसमोर उघड झाल्यापासून सध्या सुभेदारांच्या घरात सायलीशी कोणीही नीट बोलत नाहीये. तिला फक्त अर्जुनचा आधार असतो. हळुहळू सासूबाई कल्पना आणि पूर्णा आजीचं मन पुन्हा एकदा जिंकण्याचा सायली प्रयत्न करत आहे.

मात्र, आता लवकरच सायलीला सुभेदारांच्या घरातील आणखी एका व्यक्तीची मनधरणी करावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच अर्जुनची सख्खी बहीण अस्मिता तिच्या नवऱ्याकडे राहायला गेल्याचं पाहायला मिळालं होतं पण, आता अस्मिता मालिकेत पुन्हा एकदा एन्ट्री घेणार आहे.

अस्मिताची भूमिता साकारणाऱ्या मोनिकाच्या इन्स्टाग्राम स्टोरीमुळे चाहत्यांना मोठी हिंट मिळाली आहे. खरंतर, मोनिका आई होणार असल्याने तिने या मालिकेतून ब्रेक घेतला होता. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शूटिंग पूर्ण करून मोनिका सुट्टीवर गेली होती. यानंतर मार्च महिन्यात अभिनेत्रीला मुलगी झाली. अभिनेत्रीच्या डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, आता मोनिकाची चिमुकली लेक ३ महिन्यांची झाल्यावर ती पुन्हा एकदा कामाला सुरुवात करणार आहे.

मोनिकाने याआधी ‘राजश्री मराठी’च्या मुलाखतीत आणि तिच्या युट्यूब व्लॉगमध्ये ती लवकरच मालिकेत परत असल्याचं सांगितलं होतं. आता मोनिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून मालिकेच्या सेटवरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने “माय हॅपी प्लेस” असं कॅप्शन दिलं आहे.

मोनिकाचा या व्हिडीओमधील अस्मिताच्या भूमिकेसारखा हुबेहूब लूक आणि यामधील बॅकग्राऊंड पाहता तिची ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर एन्ट्री झाल्याची दाट शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता ‘ठरलं तर मग’ मालिकेत अस्मिता ( मोनिका दबाडे ) केव्हा येणार, तिच्या एन्ट्रीनंतर सायलीच्या आयुष्यात काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ही मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रात्री ८.३० वाजता प्रसारित केली जाते.