‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या प्रेक्षकांना नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यामध्ये जुई गडकरी, अमित भानुशाली, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, ज्योती चांदेकर, सागर तळाशीकर अशा दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

मालिका विश्वातील अनेक कलाकार हळुहळू नाटक व चित्रपटांकडे वळत आहेत. आता लवकरच ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अभिनेत्री देखील प्रेक्षकांना एका भूमिकेत झळकताना दिसेल. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून तिने नुकतीच आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यांना दिली.

हेही वाचा : रितेश-जिनिलीयाच्या मुलांनी आजीबरोबर ‘असं’ साजरं केलं नववर्ष! देशमुखांच्या सुनेने शेअर केला खास फोटो

‘ठरलं तर मग’ मालिकेत खलनायिका प्रियाची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियांका तेंडोलकर लवकरच रंगभूमीवर पुनरागमन करणार आहे. ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ या नव्या नाटकात ती प्रमुख भूमिका साकारणार आहे. यामध्ये प्रियांकासह ‘सुभेदार’ फेम अभिनेते अजय पुरकर, अतुल महाजन व आशिष पवार यांच्या महत्त्वाच्या भूमिका असतील. नाटकाचं स्क्रिप्ट शेअर करत अभिनेत्रीने या फोटोला “एक नवीन सुरुवात…गणपती बाप्पा मोरया” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : “…अन् केदार काकाने अंगठी शोधली”, सुकन्या मोनेंच्या लेकीने सांगितला ‘बाईपण भारी देवा’चा किस्सा, जुलियाने ठेवलेली ‘ही’ मजेशीर अट

हेही वाचा : Video: ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर रुपाली भोसलेचा वाढदिवस ‘असा’ केला साजरा, अभिनेत्री व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चाहत्यांसह ‘ठरलं तर मग’च्या संपूर्ण टीमने प्रियांकाला या नव्या नाटकासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. आता हे नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला केव्हा येणार याबद्दल सर्वांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.