Tharala Tar Mag Fame Jui Gadkari Birthday Celebration : ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेतून अभिनेत्री जुई गडकरीने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. यानंतर जुईने आणखी काही मालिकांमध्ये सहायक भूमिका साकारल्या. पण, त्यानंतर २०११ मध्ये प्रसारित झालेल्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे अभिनेत्रीचं नशीब रातोरात पालटलं. जुईला ‘कल्याणी’ या भूमिकेमुळे सर्वत्र एक नवीन ओळख मिळाली. प्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री सध्या ‘स्टार प्रवाह’च्या ‘ठरलं तर मग’ या टीआरपी टॉपर मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे.

आज जुईचा वाढदिवस असल्याने ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर खास सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी जुईचे चाहते सुद्धा सेटवर पोहोचले होते. अभिनेत्रीने सुरुवातीला केक कापला. त्यानंतर सर्व चाहत्यांनी अभिनेत्रीला गिफ्ट्स दिले. अभिनेत्रीचा आज ३८ व्या वर्षांत पदार्पण केलं आहे.

जुईला एका चाहतीने चॉकलेटचा बॉक्स भेट म्हणून दिल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आपल्या आवडीचे सगळे चॉकलेट्स एकाच बॉक्समध्ये पाहून जुई भारावून गेली होती. यानंतर अन्य काही चाहत्यांनी जुईला फोटोफ्रेम, गणपती बाप्पाची मूर्ती, भगवान शिव शंकराचं स्वत:च्या हाताने डिझाइन केलेलं स्केच, कॅनव्हास पेटिंग अशा खूप भेटवस्तू दिल्या.

यानंतर एका चाहत्याने जुईला कॉफीचा कप भेट दिला, यावर अभिनेत्री आणि तिच्या मांजरीचे फोटो प्रिंट करण्यात आले होते. हा कॉफीचा कप पाहून जुई भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. “ही आता माझ्याबरोबर नाहीये…माझी छकुली” असं सांगताना जुईचे डोळे पाणावले होते.

यानंतर जुईने सेटवर आलेल्या सगळ्या चाहत्यांना तिच्याकडून देखील काही भेटवस्तू दिल्या. तसेच अशाचप्रकारे मालिकेवर प्रेम करत राहा असंही अभिनेत्रीने या चाहत्यांना सांगितलं.

दरम्यान, जुई गडकरीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ ‘स्टार प्रवाह’ने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यासह मालिकेत काम करणाऱ्या सहकलाकारांनी देखील जुईच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये जुईसह अमित भानुशाली, ज्योती चांदेकर, प्राजक्ता कुलकर्णी, प्रियंका तेंडोलकर, मोनिका दबडे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.