जुई गडकरी ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे अभिनेत्री घराघरांत पोहोचली. ही मालिका जवळपास ५ वर्ष सुरु होती. परंतु, त्यानंतर अचानक ओढवलेल्या आजारपणामुळे जुईने कलाविश्वातून ब्रेक घेतला. आयुष्यात आलेल्या या कठीण प्रसंगातून अभिनेत्रीने कसा मार्ग काढला याविषयी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने खुलासा केला आहे.

हेही वाचा : आई-बाबांनी नव्हे तर ‘या’ व्यक्तीने ठेवलंय गश्मीरचं नाव, अभिनेत्याने स्वत: केला खुलासा

जुई गडकरीच्या घरी दीड दिवसांच्या गणपती बाप्पाचं दरवर्षी आगमन होतं. गडकरींच्या घरच्या गणपती बाप्पाला १५० वर्षे पूर्ण झाल्याचं अभिनेत्रीने एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, “बाप्पा माझ्यासाठी खूप जवळचा आहे. बाप्पासाठी मोदक, सजावट करायलं मला खूप आवडतं परंतु, मध्यंतरी मी आजारी पडल्याने मला या गोष्टी करता येत नव्हत्या. माझ्या हातचं हवं असेल, तर बाप्पा तूच मला पुन्हा उभं करशील. असं साकडं मी बाप्पाला घातलं होतं. त्याने माझं ऐकलं…मी बरी झाले आणि त्यानंतर मी बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवला. देवावर माझा खूप विश्वास आहे.”

हेही वाचा : “धर्माच्या नावावर भडकवणारे…”, जालन्यातील लाठीचार्ज प्रकरणी किरण मानेंची संतप्त पोस्ट; म्हणाले, “मराठा समाजाला आरक्षण…”

जुई गडकरीने ‘श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी’ या मालिकेत ‘चंदा’ ही सहायक भूमिका साकारत मालिका विश्वात पदार्पण केलं होतं. पुढे ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’, ‘तुजविण सख्या रे…’ या मालिकांमध्ये तिने सहायक भूमिका साकारल्या. परंतु, ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे अभिनेत्रीचं नशीब बदललं. जुई गडकरी मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

हेही वाचा : “आपल्या वडिलांसारखं बनू नकोस”; सनी देओलचा लहान मुलगा राजवीरला आजोबा धर्मेंद्र यांनी दिला सल्ला, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पुढचं पाऊल’नंतर अभिनेत्रीने जुईने बिग बॉस मराठी, वर्तुळमध्ये काम केलं. त्यानंतर अचानक ओढवलेल्या आजारपणामुळे तिला कलाविश्वातून ब्रेक घ्यावा लागला. मोठ्या ब्रेकनंतर जुईने ‘ठरलं तर मग’ या मालिकेद्वारे दमदार पुनरागमन केलं. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेत जुईसह अमित भानुशालीने मुख्य भूमिका साकारली आहे.