Tharala Tar Mag Fame Prajakta Dighe : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली ३ वर्षे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता मालिकेतील कलाकारांचं सुद्धा एकमेकांशी खूप छान बॉण्डिंग तयार झालं आहे. मालिकेच्या सेटवर सगळे सण, कलाकारांचे वाढदिवस मोठ्या हौशेने साजरे केले जातात. नुकताच या ‘ठरलं तर मग’च्या सेटवर अभिनेत्री प्राजक्ता दिघे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यांनी याची खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
अभिनेत्री प्राजक्ता दिघे ‘ठरलं तर मग’ मालिकेत सायलीच्या सासूबाईंची म्हणजेच कल्पना सुभेदार ही भूमिका साकारत आहेत. आजवर त्यांनी बऱ्याच गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे प्राजक्ता दिघे यांचा मालिकाविश्वात एक वेगळा चाहतावर्ग तयार झालेला आहे. नुकताच ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
‘ठरलं तर मग’ मालिकेतील सगळ्या अभिनेत्रींनी एकत्र येऊन त्यांच्या मेकअप रुममध्ये सुंदर अशी सजावट केली होती. प्राजक्ता हे सरप्राइज पाहून खूपच आनंदी झाल्या होत्या. यानंतर त्यांनी केक कापला…मालिकेतील सहकलाकारांनी प्राजक्ता यांना गिफ्ट्स दिले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. सायली, प्रतिमा, प्रिया, अस्मिता, मेकअप आर्टिस्ट, हेअर स्टायलिस्ट अशी संपूर्ण टीम प्राजक्ता यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आली होती.
प्राजक्ता दिघे यांच्या बर्थडेचं सेटवर सुद्धा सेलिब्रेशन करण्यात आलं. यावेळी अर्जुन, अस्मिताचा नवरा, मालिकेचे दिग्दर्शक ही सगळी मंडळी उपस्थित होती. अभिनेत्री भावना व्यक्त करत लिहितात, “माझ्या ‘ठरलं तर मग’ मालिकेतील मैत्रिणींनी माझा वाढदिवस खूपच प्रेमाने आणि आपुलकीने साजरा केला. त्यांनी मला खूप सुंदर सरप्राइज दिलं. याशिवाय ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या संपूर्ण युनिटने माझ्या बर्थडेचा दिवस अधिकाधिक सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न केले. आपण सगळेजण आणि आपल्यातील प्रेम असंच कायम राहूदेत.”
प्राजक्ता दिघे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर मोनिका दबाडे, दिशा दानडे, मेघना ऐरंडे या सगळ्या कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहेत.
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेबद्दल सांगायचं झालं तर, आता सायलीला सदाशिव व मैनावती तिचे खरे आई-बाबा नसल्याचं सत्य जमलेलं आहे. दोघंही घरात चोरी करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतात. पण, सायलीच्या हुशारीमुळे अर्जुन सदा व मैनाला वेळीच पकडतो. आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
