‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या अर्जुन-सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सुभेदार कुटुंबासमोर उघड झाल्याचा सीक्वेन्स चालू आहे. गेल्या काही दिवसांपासून चैतन्यला साक्षी शिखरे प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी अर्जुन-सायली सातत्याने प्रयत्न करत असतात. साखरपुड्याची धावपळ सुरु असतानाच साक्षी अर्जुन-सायलीचा उल्लेख आदर्श जोडपं म्हणून करते. यावर चैतन्य म्हणतो, ‘अगं आदर्श कसलं सायली-अर्जुन खरं जोडपं पण नाहीये’ पुढे तो साक्षीला दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सांगतो.

अर्जुन-सायलीच्या लग्नाचं एवढं मोठं सत्य उघड झाल्यावर साक्षी काहीशी चक्रावून जाते. एवढा मोठा पुरावा हाती लागला म्हणून ती आनंदी असते. पुढे, याबद्दल ती प्रियाला कल्पना देते. अर्जुन-सायलीचा बदला घेण्यासाठी प्रिया सगळं सत्य जाऊन पूर्णा आजीला सांगते. पूर्णा आजीला हे सगळं ऐकून मोठा धक्का बसतो.

हेही वाचा : “मुंबईहून लातूरला आलो…”, मतदान केंद्रावर एकत्र पोहोचले देशमुख कुटुंबीय, रितेश-जिनिलीया म्हणाले…

कॉन्ट्रॅर्ट मॅरेजबद्दल समजल्यावर पूर्णा आजी सायलीवर प्रचंड भडकते. हे सगळं खरंय का? याबद्दल तिच्याकडे विचारपूस करते. शेवटी पूर्णा आजी सायलीला देवीआईसमोर शपथ घ्यायला लावते. “तुझं अर्जुनवर प्रेम आहे का? आणि तुमचं लग्न खरंय का?” या दोन्ही प्रश्नांची उत्तर सायलीने होकारार्थी दिल्याने पुन्हा एकदा प्रियाचा मोठा डाव फसतो. परंतु, घडला प्रकार पाहून अर्जुन काहीसा गोंधळतो. हे सत्य कोणालाही माहिती नसतं मग, अचानक प्रियाला कसं काय समजलं अशा विचारत तो असतो.

हेही वाचा : थाटात लग्न केल्यावर ‘कन्यादान’ फेम जोडी निघाली हनिमूनला; पासपोर्टचा फोटो शेअर करत म्हणाले…

अर्जुन कसलाही विचार न करता थेट चैतन्यला फोन करून सुभेदारांच्या घरी घडलेल्या संपूर्ण गोंधळाची माहिती देतो. हे सत्य आपल्यालाच माहिती असताना प्रियापर्यंत कसं आणि कुठून पोहोचलं? असा प्रश्न तो चैतन्यला विचारतो. आता यावर चैतन्य काय उत्तर देणार? आपल्या मित्राने साक्षीला याबद्दल सांगितलंय हे सत्य अर्जुनला तो कसं सांगणार…आणि इथून पुढे अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा : “पहिली गाडी घेतली पण, तेव्हा बाबा नव्हते”, वडिलांच्या आठवणीत गौरव मोरे भावुक; म्हणाला, “मी आणि आई…”

View this post on Instagram

A post shared by SerialJatra (@serialjatra)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशातच आता काही दिवसांमध्ये मालिकेत कुसुम ताईंचं पुनरामन होणार आहे. अर्जुनने याबद्दल इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत माहिती दिली होती. चैतन्यशिवाय कुसुमला या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कल्पना असते. आता अर्जुन-सायलीला ती कसा पाठिंबा देते हे आगामी भागात प्रेक्षकांना समजेल.