‘ठरलं तर मग’ ही मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सायली, अर्जुन पूर्णा आजी, प्रिया, साक्षी, चैतन्य सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. सध्या मालिकेत सायलीला हळुहळू तिचा भूतकाळ आठवत असल्याचा सीक्वेन्स सुरू आहे. परंतु, या सगळ्यात गेले काही दिवस पूर्णा आजी नवस फेडण्यासाठी बाहेर गेल्याचं दाखवण्यात आलं आहे.

‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजी प्रतिमासाठी केलेला नवस फेडण्यासाठी गावी गेल्याचं दाखवण्यात येत आहे. पण, प्रत्यक्षात प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी काही दिवस मालिकेतून ब्रेक घेतल्याचं त्यांची मुलगी व चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सांगितलं आहे. ‘ठरलं तर मग’ मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर या तेजस्विनी पंडितच्या आई आहेत.

police reaction on Gurucharan Singh missing
गुरुचरण सिंग बेपत्ता असण्याबद्दल पोलिसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सीसीटीव्हीत जे दिसतंय त्यानुसार ते…”
Chunky Panday on daughter Ananya Panday relationship with Aditya Roy Kapur
“ती माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावते, त्यामुळे…”, चंकी पांडेचं अनन्या पांडे-आदित्य रॉय कपूरच्या नात्याबद्दल विधान
IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीच्या वादळी खेळीने आनंद महिंद्राही झाले चकित, माहीचे कौतुक करताना म्हणाले, “कृतज्ञ आहे की माझं नाव Mahi-ndra…”
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”

हेही वाचा : “कलाकार म्हणून त्रास होतो”, ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘जोगवा’बद्दल उपेंद्र लिमयेंनी मांडलं मत; म्हणाले, “काही अमराठी लोकांनी…”

तेजस्विनीने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टवर पूर्णा आजीच्या चाहत्याने त्या मालिकेत का दिसत नाहीत अशी विचारपूस केली होती. नेटकरी अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंट करत विचारतो, “आम्हाला सांगा पूर्णा आजी कुठे आहे? मालिकेत दिसत नाहीत इतक्या दिवसांपासून…आजी ठिक आहेत ना?”

हेही वाचा : Video : मृण्मयी देशपांडेच्या लाडक्या बहिणीचं लग्न! गौतमीच्या हातावर रंगली स्वानंदच्या नावाची मेहंदी, पाहा झलक

चाहत्याच्या या प्रश्नाला उत्तर देत तेजस्विनी लिहिते, “ती आजारी होती…दोन आठवडे ICU मध्ये होती. पूर्णपणे बरी झाल्यावर पूर्णा आजी लवकरच पडद्यावर पुन्हा परत येईल.”

tejaswini
तेजस्विनी पंडित

दरम्यान, पूर्णा आजी म्हणजेच ज्योती चांदेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं, तर त्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. त्यांच्या दोन्ही मुलींसह त्या अनेक फोटो शेअर करतात. ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’, ‘सांजपर्व’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. याशिवाय छोट्या पडद्यावरील ‘तू सौभाग्यवती हो’, ‘छत्रीवाली’ या मालिकांमध्येही त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेद्वारे त्या प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.