‘ठरलं तर मग’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेत आता अर्जुनचा वाढदिवस आणि सायलीच्या भूतकाळांच्या आठवणींचा सीक्वेन्स सुरू आहे. अर्जुनचा वाढदिवस सुभेदारांकडे साजरा झाल्यावर दोघेही आश्रमात जायला निघतात. आश्रमातील मुलांना भेटून घरी परत येत असताना सायलीला अपघाताचे भास होऊ लागतात. ती प्रचंड अस्वस्थ होते अन् चक्कर येऊन पडते.

सायलीला चक्कर आल्याचं पाहून अर्जुन प्रचंड घाबरतो आणि घरातील इतरांना याबाबतची माहिती देतो. सायलीला शुद्ध आल्यावर ती घरातील सगळ्यांना भूतकाळातील अपघात व वाढदिवसाचं रहस्य सांगते. त्यामुळे सुभेदार कुटुंबीय प्रचंड आनंदी होतात. आम्हाला वाढदिवसाचं तू आधी का नाही सांगितलंस? याबाबत ते सायलीकडे विचारणा करतात.

हेही वाचा : “आयुष्यभर…”, सुकन्या मोनेंनी लाडक्या लेकीसाठी हातावर काढला खास टॅटू, फोटो आला समोर…

सायलीच्या वाढदिवसाचं समजल्यावर अर्जुन तिला सरप्राईज द्यायचं ठरवतो आणि स्वत:च्या हाताने बायकोचं औक्षण करतो. तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देतो. यावरून सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नात्यात हळुहळू प्रेम निर्माण होत असल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : लगीनघाई! मुग्धा वैशंपायन-प्रथमेश लघाटेचा ग्रहमख सोहळा पडला पार, पारंपरिक लूकने वेधलं लक्ष

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाढदिवसाचं सेलिब्रेशन पार पडल्यावर अर्जुन सायलीला मधूभाऊंच्या केससंदर्भात नव्या अपडेट सांगतो. तसेच लवकरात लवकर मी मधूभाऊंना सोडवेन अशी शाश्वती तो बायकोला देतो. परंतु, सायलीला सगळी माहिती देत असताना अर्जुन मनातल्या मनात तिच्या आई-बाबांना शोधून काढण्याचा निर्धार करतो. असं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. आता अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधेल का? आणि सायलीचं किल्लेदारांची खरी लेक तन्वी असल्याचं सत्य त्याला समजेल का? या गोष्टींचा उलगडा मालिकेत लवकरच होणार आहे.