Tharala Tar Mag : ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या पूर्णा आजीने अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचा घाट घातला आहे. प्रिया सायली विरोधात सुभेदार कुटुंबीयांचे कान भरते. यामुळे कल्पना आणि पूर्णा आजी मिळून अर्जुन-प्रियाचं लवकरात लवकर लग्न लावायचं असं ठरवतात. अर्थात, अर्जुन याला नकार देतो पण, याच दरम्यान पूर्णा आजीची प्रकृती बिघडते.

पूर्णा आजीला सुभेदार कुटुंबीय रुग्णालयात दाखल करतात. यावेळी आजी अर्जुनकडून ‘तू तन्वीशी लग्न कर’ असं वचन घेते. मालिकेत खरी तन्वी ही सायलीच असते. पण, हे सत्य कोणालाच माहिती नसतं. याचाच गैरफायदा घेऊन इतके दिवस प्रिया… तन्वी किल्लेदार म्हणून वावरत असते. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य उघड केल्यावर आता काही करून अर्जुनशी लग्न करायचं हेच प्रियाचं ध्येय असतं. मात्र, दुसरीकडे सायलीने ‘मी माझ्याच नवऱ्याशी लग्न करणार’ असा निश्चय केला आहे.

आता अर्जुनचं लग्न नेमकं कोणाशी होणार याची चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर सायली आणि चैतन्य यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतींमध्ये सायली आणि अर्जुनचं लग्न होणार असं सांगितलं आहे. या दोघांचं लग्न होणार पण, ते कसं, कधी होणार यासाठी तुम्हाला आगामी एपिसोड्स पाहावे लागतील असं या कलाकारांनी सांगितलं.

‘ठरलं तर मग’ने नुकतेच ७०० भाग पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने या टीमने सेटवर केक कापून सेलिब्रेशन केलं. यावेळी मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांनी आगामी ट्रॅकबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे. इन्स्टाग्राम लाइव्हवर एका चाहत्याने, “सायलीच ‘तन्वी’ आहे हे सत्य कधी कळणार?” असा प्रश्न विचारला. यावर, टिमसह दिग्दर्शकाने, “लवकरच खरी तन्वी कोण आहे हे सत्य समजणार आहे. पण, ते कोणाला समजणार हे तुम्हाला कळेल” असं सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सायलीच खरी तन्वी आहे” हे सत्य समोर आल्यावर अर्जुन पूर्णा आजीला दिलेलं वचन देखील मोडणार नाही. कारण, त्याने आजीला प्रियाशी नव्हे तर ‘तन्वीशी लग्न करेन’ असं वचन दिलेलं आहे. त्यामुळे आगामी भागातच हे सत्य मालिकेतील महत्त्वाच्या व्यक्तीसमोर येण्याची दाट शक्यता आहे. मालिकेचा हा आगामी ट्रॅक पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत.