छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा’ हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील कलाकार त्यांच्या खुमासदार विनोदाने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक कलाकार या कार्यक्रमात येऊन गेले आहेत. मराठी. भोजपुरी, दाक्षिणात्य, बॉलिवूडचित्रपटसृष्टीतील कलाकारांनी आपली हजेरी लावली आहे. नुकतंच ‘ऊंचाई’ चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली होती.

‘ऊंचाई’ चित्रपटातील कलाकार कार्यक्रमात येताच कपिलने सगळ्यांचे स्वागत केले. कपिलने नेहमीप्रमाणे आपल्या विनोदी ढंगात या कलाकारांची खेचण्यास सुरवात केली. तो असं म्हणाला कि मला कळलं की “या कार्यक्रमात येण्यासाठी महिला पुरुषांच्या आधी तयार झाल्या.” त्यावर लगेचच अभिनेत्री नीना गुप्ता म्हणाल्या “अनुपम यांच्यामुळे वेळ लागला कारण त्यांची केशरचना करण्यात वेळा लागतो.” यावर अनुपम खेर असं म्हणाले, “खूप दिवसांपासून माझे केस अस्ताव्यस्त होते, आज मी ते सेट करून आलो आहे”. हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकला.

मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांची महत्त्वाची घोषणा; “आता महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहं…”

अनुपम खेर यांना या कार्यक्रमात सहभागी झाले म्हणून ट्रोलदेखील करण्यात आले होते. दरम्यान, अनुपम खेर यांचा ‘ऊंचाई’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये त्यांच्यासह अमिताभ बच्चन, बोमन इराणी, नीना गुप्ता, डॅनी डॅन्झोपा हे कलाकार दिसणार आहेत. राजश्री फिल्म्सच्या सूरज बडजात्या यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चित्रपटाची कथा ६० वर्षं पार केलेल्या ४ मित्रांच्या भोवती लिहिली गेली आहे. या ४ पैकी एका मित्राचं निधन होतं, आणि केवळ त्या मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी उरलेले तिघे मित्र हे माऊंट एव्हरेस्ट शिखर चढायचं ठरवतात. असं एकंदर या चित्रपटाचा ट्रेलर बघून अंदाज येत आहे. ११ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.