Chetan Wadnere and Rujuta Dharap Wedding : मराठी कलाविश्वात सध्या लगीनघाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. शुभंकर एकबोटे आणि अमृता बने या लोकप्रिय जोडीपाठोपाठ आता आणखी एक अभिनेता लग्नबंधनात अडकला आहे. ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता चेतन वडनेरेने लग्न केलं आहे. इन्स्टाग्रामवर लग्नातील सुंदर असे फोटो शेअर करत अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला.

चेतन वडनेरे आणि त्याची पत्नी अभिनेत्री ऋजुता धारप यांनी लग्नातील फोटो शेअर करत या फोटोंना ‘कुर्यात सदा मंगलम्’ असं कॅप्शन दिलं आहे. अभिनेत्रीने लग्नात मोरपिशी रंगाची सुंदर अशी नऊवारी साडी, त्यावर जांभळ्या रंगाचा ब्लाऊज, पारंपरिक दागिने असा लूक केला आहे. तर, चेतनने लग्नात सोहळं नेसलं होतं. या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : ‘चला हवा येऊ द्या’ संपल्यावर लोकप्रिय अभिनेत्याची ‘झी मराठी’च्या ‘शिवा’ मालिकेत एन्ट्री, पाहा प्रोमो

चेतन आणि ऋजुता यांनी लग्नात एकमेकांसाठी हटके उखाणे घेतले. या दोघांनी घेतलेल्या उखाण्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. चेतन उखाणा घेत म्हणतो, “ठाण्याचे असतील तलाव फेमस पण, नाशिकची आमची नदीच; ऋजुताचं नाव घेतो आमचं ठरलं होतं आधीचं!”

हेही वाचा : Video : सातासमुद्रापार ‘नाच गं घुमा’! मुक्ता बर्वेचा परदेशात जबरदस्त डान्स, व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तिसरी घंटा झाली पडदा उघडला कायमचा, चेतनच्या सोबतीने सुरू करते नवा अंक संसाराचा!” असा सुंदर उखाणा ऋजुताने आपल्या नवऱ्यासाठी घेतला. दरम्यान, मराठी कलाविश्वातून सध्या या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.