‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात होता. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात या मालिकेने निरोप घेतला. यामधील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. अप्पूच्या मोठ्या बहिणीची म्हणजेच नेत्राची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रांजल आंबवणे ही देखील घराघरांत लोकप्रिय झाली होती. ‘ठिपक्यांची रांगोळी’ संपल्यावर प्रांजलने भावुक पोस्ट शेअर केली होती. सध्या अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. तिने न्यूयॉर्कमधून शेअर केलेली अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

प्रांजल आपल्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये एन्जॉय करत असल्याचं पाहायला मिळत आहे. वाढदिवशी तिच्या नवऱ्याने तिला खास सरप्राइज दिलं. याचा व्हिडीओ शेअर करत प्रांजलने आपल्या पतीचे आभार मानले आहेत. वाढदिवशी न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरच्या बड्या स्क्रीनवर अभिनेत्रीचे गोड फोटो झळकले. याचं संपूर्ण प्लॅनिंग तिच्या पतीने केलं होतं.

हेही वाचा : “संध्याकाळची मालिका दुपारी पाहिली जाईल का?”, ‘आई कुठे काय करते’च्या नव्या वेळेबद्दल मिलिंद गवळींची पोस्ट; म्हणाले…

प्रांजल या गोड सरप्राइजचा व्हिडीओ शेअर करत लिहिते, “वाढदिवसाचं सगळ्यात भारी सरप्राइज…१८००० sq feet न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरच्या स्क्रीनवर मला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या. माय डिअर Hubby ( नवरा ) खूप खूप धन्यवाद, तुला खूप खूप प्रेम”

हेही वाचा : मराठमोळ्या श्वेता शिंदेचं शाहिद कपूर, विवेक ओबेरॉय अन् करीनाबरोबर आहे खास कनेक्शन; म्हणाली, “हे कलाकार तेव्हा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. याशिवाय प्रांजलने शेअर केलेल्या व्हिडीओवर सध्या नेटकऱ्यांसह तिच्या मालिकेतील सहकलाकार कौतुकाचा वर्षाव करत आहेत.