अभिनेता समीर परांजपे आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे यांची प्रमुख भूमिका असलेली मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ सध्या जोरदार सुरू आहे. जूनपासून सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील तेजस व मानसीची जोडी आता प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्यांपैकी एक झाली आहे. तसंच गायत्री, दिनेश, संपत, संपदा, निधी, प्रतिमा, आभा, सूरज, शोभा ही पात्र देखील घराघरात पोहोचली आहेत. यामधील शोभा म्हणजेच अभिनेत्री पुर्णिमा तळवलकर यांनी आपल्या लाडक्या भाचीचा हट्ट पूर्ण केला. याचा व्हिडीओ अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री पुर्णिमा तळवलकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. आपल्या आगामी कामाबद्दल चाहत्यांना माहित देत असतात. तसंच चालू घडामोडींवर देखील परखड मत व्यक्त करत असतात. नुकतंच त्यांनी भाचीबरोबरचा डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा – रिअ‍ॅलिटी शोमुळे स्पर्धकांनी केल्या होत्या आत्महत्या! त्यागराज खाडिलकरचा धक्कादायक खुलासा, म्हणाला…

“भाचीच्या हट्टापाई शेवटी हे रील बनवलं. दोन दिवस मागे लागली होती. गाणं ही तिनेच निवडलं. माझी भाची मिहिरा…”, असं कॅप्शन लिहित पुर्णिमा तळवलकर यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत आत्या-भाची ‘बादल बरसा बिजुली’ गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत.

पुर्णिमा तळवलकर व त्यांच्या भाचीच्या व्हिडीओवर इतर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेत्री शिल्पा तुळसकर, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे, रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसंच “गोड आहे तुझी भाची”, “दोघीपण गोड दिसताय”, “किती गोड”, “भारी गं” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा – ‘ही’ लोकप्रिय मराठी अभिनेत्री ज्युनियर एनटीआर व जान्हवी कपूरच्या ‘देवरा’ चित्रपटात झळकणार, फोटो केले शेअर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पुर्णिमा तळवलकरांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्यांनी मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सध्या त्या ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेबरोबर ‘स्थळ आले धावून’ हे नाटक करत आहेत. त्यांच्या या नाटकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकात पुर्णिमा यांच्यासह अभिनेते संजय मोने, डॉ. गिरीश ओके काम करत आहेत.