झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. त्रिनैना देवीची मुलगी नेत्रा आणि विरोचक रुपालीची जोडी जरी ऑन स्क्रिन नायिका आणि खलनायिकेची असली तरी ऑफ स्क्रिन तितीक्षा आणि ऐश्वर्या नेहमीच मजा मस्ती करताना दिसतात. दोघीही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात आणि अनेक रील्स आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात. ऐश्वर्या आणि तितीक्षाने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

तितीक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांनी १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘मै खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटातील गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडीओ ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

‘हम दोनो है अलग अलग’ या गाण्यावर दोघी थिरकल्या आहेत. हटके डान्स स्टेप करत या जोडीने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं आहे. याला कॅप्शन देत ऐश्वर्या नारकर यांनी लिहिले, “आम्ही यात नेत्रा आणि रुपालीच्या भूमिकेत आहोत.” या रिलमध्ये तितीक्षाने तपकिरी रंगाचा प्रिंटेड को-ऑर्ड सेट घातला आहे तर ऐश्वर्या यांनी निळ्या रंगाचं शर्ट आणि सफेद पॅन्ट घातली आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. अवघ्या काही तासातचं या व्हिडीओला ५० हजारापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

हेही वाचा… सुहाना खानचा बाथटबमधील व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “रमजान सुरू आहे, जरा तरी लाज…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तितीक्षा तावडे अभिनीत ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. पाचवी पेटी शोधून नेत्रा विरोचकाचा अंत कधी करेल याची चाहते वाट पाहातायत. तितीक्षा आणि ऐश्वर्या यांच्याबरोबर अंजिक्य नानावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे अशा अनेक कलाकारांच्या या मालिकेत निर्णायक भूमिका आहेत.