मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय बहिणींची जोडी म्हणजे अभिनेत्री खुशबू तावडे आणि अभिनेत्री तितीक्षा तावडे. दोघींनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे दोघी नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी २ ऑक्टोबरला खुशबू दुसऱ्यांदा आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. यासंदर्भात तिने नुकतीच एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे; जी सध्या व्हायरल झाली आहे. खुशबूच्या या पोस्टनंतर तितीक्षाने २ ऑक्टोबरचा व्लॉग शेअर केला आहे. ज्यामध्ये खुशबूला मुलगी झाल्यानंतरचे क्षण पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री खुशबू तावडेने आपल्या चिमुकल्या लेकीबरोबरचे फोटो शेअर करत पोस्ट केली आहे. या पोस्टमधून खुशबूने लेकीचं नाव जाहीर केलं आहे. ‘राधी’ असं खुशबू आणि संग्राम साळवीच्या लेकीचं नाव आहे. २ ऑक्टोबरला राधी झाल्याची आनंदाची बातमी तितीक्षाला कशी समजली? त्यानंतर काय-काय घडलं? याचा व्लॉग तितीक्षाने तिच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18 : अविनाश मिश्रा घराबाहेर नाही तर गेला जेलमध्ये? दिला मोठा अधिकार

हेही वाचा – Video: खुशबू तावडेचं दुसरं डोहाळे जेवण घरीच साध्या पद्धतीने पडलं पार, पाहा व्हिडीओ

या व्लॉगमध्ये, २ ऑक्टोबरला तितीक्षा शूटिंग जाताना दिसत असून याचदरम्यान तिला आनंदाची बातमी समजते. खुशबूचा पती अभिनेता संग्राम साळवी तिला फोन करतो आणि मुलगी झाल्याचं सांगतो. हे ऐकताच तितीक्षाला आनंद होता. तिला अश्रू अनावर होतात. ती लगेच पती सिद्धार्थ बोडकेला फोन करते आणि आनंदाची बातमी सांगते. त्यानंतर अभिनेत्री आई-वडील आणि राघवला फोन करून खुशबूला मुलगी झाल्याचं सांगताना दिसत आहेत.

पहिल्यांदाच भाचीचा फोटो पाहून तितीक्षाला प्रचंड आनंद झाल्याचं पाहायला मिळत आहे. ती म्हणते की, अक्षरशः बाळ खुशबूसारखं दिसतंय. त्यानंतर शूटिंग पूर्ण करून तितीक्षा सिद्धार्थबरोबर हॉस्पिटलमध्ये भाचीला भेटायला जाते. सिद्धार्थने भाचीला भेटण्यासाठी खास तयारी केल्याचं दिसत आहे. हे सर्व काही तितीक्षाच्या व्लॉगमध्ये पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नींना हिंदी ‘बिग बॉस’साठी झाली होती विचारणा, नकार देण्याचं कारण देत म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तितीक्षा तावडे पुन्हा एकदा मावशी झाली म्हणून चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. तितीक्षाच्या या व्लॉगची चाहते आतुरतेने वाट पाहत होते, असं प्रतिक्रियेतून सांगत आहेत.