Titeekshaa Tawde and Siddharth Bodake : मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मुग्धा-प्रथमेश, गौतमी-स्वानंद, शिवानी-अजिंक्य या लोकप्रिय जोडप्यांपाठोपाठ आता आणखी एक प्रसिद्ध जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. ती जोडी म्हणजे तितीक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर चालू होत्या. अखेर आज या अभिनेत्रीने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.

तितीक्षा तावडेने सिद्धार्थ बोडकेबरोबरचा केळवणाचा फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. अशातच अभिनेत्रीने केळवणाचा फोटो शेअर करत लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती तिच्या चाहत्यांना दिली आहे.

Raghu Ram blames the MTV show for his divorce
“रोडीजमुळे माझा घटस्फोट झाला,” प्रसिद्ध अभिनेत्याचं विधान; म्हणाला, “माझ्या वैयक्तिक आयुष्यात…”
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
suparna shyam play important role in new show
निलेश साबळेच्या नव्या शोमध्ये झळकणार ‘लग्नाची बेडी’ फेम अभिनेत्याची पत्नी! आजवर लोकप्रिय मालिकांमध्ये केलंय काम
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

हेही वाचा : “अमृता खानविलकरबरोबर फोटो शेअर करत नाही, कारण…”, सई ताम्हणकरने स्वत: केला खुलासा; म्हणाली, “आमच्यात मैत्री…”

तितीक्षाने या फोटोमध्ये ऑफ व्हाइट रंगाची साडी, तर सिद्धार्थने पांढऱ्या रंगाचा सदरा परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. “त्याने मला डेटसाठी विचारलं आणि आमच्या या सुंदर डेटचं केळवणात रुपांतर झालं” असं कॅप्शन तितीक्षाने या फोटोला दिलं आहे. सध्या मराठी कलाविश्वातून या जोडप्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. दीपा चौधरी, गौरव मोरे, स्पृहा जोशी, ऋतुजा बागवे, गौतमी देशपांडे, अक्षया नाईक, सुरुची अडारकर, सुयश टिळक, भक्ती देसाई, ऐश्वर्या नारकर या कलाकारांनी कमेंट्स करत या दोघांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : संभाजीराजे छत्रपती यांची नवी इनिंग! सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाच्या चित्रपटात साकारणार भूमिका, खुलासा करत म्हणाले…

दरम्यान, सिद्धार्थ बोडके आणि तितीक्षा तावडेने ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. अभिनेत्रीने आतापर्यंत ‘असे हे कन्यादान’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘सरस्वती’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. याशिवाय सिद्धार्थ बोडके ‘दृश्यम २’ या बॉलीवूड चित्रपटात व नुकताच ‘श्रीदेवी प्रसन्न’मध्ये झळकला होता.