‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील व्यक्तीरेखाही तेवढ्याच लोकप्रिय आहेत. जवळपास १३ वर्षे सुरू असलेल्या या शोमध्ये जेठालाल, दयाबेन, बापूजी, टप्पू यांसारख्या व्यक्तिरेखांचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. तसेच आणखीन एक पात्र कायम चर्चेत असत ते म्हणजे सुंदर, जेठालालाच्या मेव्हण्याचे हे पात्र साकारले आहे अभिनेता मयूर वाकाणी याने, नुकताच चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मयूर एक उत्तम अभिनेता आहेच मात्र तो उत्कृष्ट कलाकारदेखील आहे. त्याने नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा साकारला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर अकाउंटवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. ‘सेल्फी विथ पीएम’ असा कॅप्शन देत त्याने पुतळ्याचा फोटो शेअर केला आहे. त्याचबरोबरीने फोटोमध्ये तो स्वतः आणि त्याची टीम दिसत आहेत.

“लहानपणीचे आणि बाबापणाचे…” सलील कुलकर्णींनी शेअर केले “तारक मेहता…”च्या सेटवरील फोटो

मयूरच्या या पुतळ्यावर नेटकऱ्यांनी कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने लिहले आहे मयूर भाई एकदम विलक्षण, तर दुसऱ्याने लिहलं आहे मस्तच सुंदर भाई. या मालिकेत तो जेठालालचा मेव्हणा दाखवला असल्याने लोकांनी त्याच्यावर विनोद करण्यास सुरवात केली. एकाने लिहले यासाठी जेठालालकडून पैसे घेतलेस का?अशा पद्धतीच्या मजेशीर कॉमेंट्स केल्या आहेत.

मयूर वाकाणीबद्दल बोलायचे झाले तर तो दिशा वाकाणीचा खरा भाऊ आहे. मयूर मालिकेत त्याच्या कॉमिक टायमिंगने चाहत्यांना प्रभावित करत आहे. मयूर मूळचा अहमदाबादचा असून त्याने शिल्पकलेतील पदवी संपादन केली आहे. याचबरोबरीने त्याने अनेक गुजराती नाटकांमध्ये काम केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tmkoc actor mayur wakani create sculpture of pm narendra modi and shared photo spg