Tula Japnar Ahe Serial Promo : ‘तुला जपणार आहे’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हॉरर मालिका आहे. यामध्ये अंबिका, मीरा, अथर्व, वेदा, माया, मंजिरी व शिवनाथ ही महत्त्वाची पात्र आहेत. मराठीतील लोकप्रिय कलाकार या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. सध्या मालिकेत महत्त्वाचा ट्रॅक सुरू असून आता अखेर मीरा व तिच्या राधा ताईची म्हणजेच अंबिकाची भेट झाली असून अंबिकाच राधा आहे आणि तीच मीराची मोठी बहीण असल्याचं सत्य मीराला नुकतंच समजलं असल्याचं मालिकेत पाहायला मिळालं.
‘तुला जपणार आहे’ मालिकेत मंजिरीने म्हणजेच अथर्वच्या आईने आणि मायाने अंबिकाची हत्या केलेली असते आणि हे सत्य अथर्वपासून लपवून ठेवण्यात आलेलं असतं. यासह तिच्या मृत्यूनंतर मंजिरीने अंबिकाच्या आत्म्याला कैद करून ठेवलेलं असतं. परंतु, आता मंजिरीचं सत्य मीरा आणि अथर्वसमोर येणार असल्याचं समोर आलेल्या प्रोमोतून पाहायला मिळतं. ‘झी मराठी’ वाहिनीने सोशल मीडिया पेजवरून हा प्रोमो शेअर करत त्याला “मंजिरीचं सत्य मीरासमोर उघडकीस येणार?” अशी कॅप्शन दिली आहे.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये मंजिरी रागाच्या भरात मायाचा गळा दाबत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करताना दिसते. त्यावेळी माया अथर्वला आवाज देते आणि वाचवा वाचवा असं ओरडत असते. तेवढ्यात त्या खोलीत मीरा व अथर्व येतात आणि मंजिरीला मायाचा गळा दाबताना पाहतात. हे पाहून अथर्वला धक्का बसतो आणि तो “आई…” अशी हाक मारतो आणि तिला थांबवतो. त्यानंतर माया मंजिरीचा हात झटकून तिथून धावत मीरा व अथर्वकडे जाते आणि त्यांना मंजिरीचं सत्य सांगताना दिसते.
मंजिरीचं सत्य मीरासमोर येणार?
प्रोमोमध्ये माया मीरा व अथर्वला “वाचवा वाचवा, मला वाचवा” असं म्हणते. पुढे माया घाबरत घाबरत त्या दोघांना मंजिरीचं सत्य सांगत म्हणते, “ही बाई, हिने सगळं केलंय; अंबिकाचा आत्मा, अंबिकाचं भूत आहे या घरात आणि त्याला हिने कैद केलंय.” हे ऐकून मीरा व अथर्वला धक्का बसतो आणि ते दोघे मंजिरीकडे बघतात. मायाने आपल्याबद्दलचं सगळं सत्य सांगितल्यामुळे मंजिरी घाबरलेली दिसते.
मायाने मीरा व अथर्वला मंजिरीने अंबिकाच्या आत्म्याला कैद करून ठेवलंय हे सांगितल्यानंतर आता हे दोघे काय भूमिका घेतील हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळेल. मा एकूणच ‘तुला जपणार आहे’मध्ये आता ट्विस्ट येणार असल्याचं या प्रोमोमधून पाहायला मिळतं.