Zee Marathi Tula Shikvin Changalach Dhada : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेत सध्या अक्षरा-अधिपतीमध्ये दुरावा आल्याचा सीक्वेन्स चालू आहे. भुवनेश्वरीने मोठा डाव खेळून अक्षराला काही महिन्यांआधी सूर्यवंशीच्या घराबाहेर काढलं आहे. काही करून अक्षरा-अधिपतीचा संसार मोडायचा हा भुवनेश्वरीचा मुख्य हेतू असतो.

भुवनेश्वरी लेक अन् सुनेमध्ये वाद निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न करते. अक्षराच्या सख्ख्या बहिणीशी हात मिळवणी करून भुवनेश्वरी अक्षरा-अधिपतीच्या संसारात संशय निर्माण करते. एवढंच काय तर दोघांची एकमेकांशी भेट होऊ नये यासाठी देखील तिने अनेक प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले होते.

आता भुवनेश्वरी घटस्फोटाचा मोठा डाव खेळणार आहे. वकिलांची भेट घेऊन भुवनेश्वरी घटस्फोटाचे कागद बनवून घेते. आता यावर अधिपतीच्या नावाची सही करण्यासाठी दुर्गेश्वरी रात्रभर सराव करते. वकिलांच्या समोर ती घटस्फोटाच्या कागदावर अधिपतीच्या नावाने खोट्या सह्या करते. हे कागद अक्षरापर्यंत पोहोचल्यावर तिला मोठा धक्का बसतो.

आता मालिकेत गुढीपाडवा विशेष भाग पार पडणार आहे. यामध्ये अक्षरा सासूला खुलं आव्हान देणार आहे. अक्षरा शाळेत गुढीची पूजा करत असते. एवढ्यात तिथे भुवनेश्वरी पोहोचते. ती सुनेला विचारते, “मंगळसूत्र काढून ठेवायची वेळ आली आणि तुम्ही नात्याची गुढी कसली उभारताय?” यावर अक्षरा म्हणते, “माझ्या नात्याची गुढी, माझ्या नवऱ्याच्या घरात तुम्हाला मी लवकरच उभी करून दाखवेन…”

अक्षराचं उत्तर ऐकून भुवनेश्वरी भडकून म्हणते, “नात्याची गुढी उभी करून दाखवाच मग, आम्ही गुडघ्यावर येऊ आणि मान्य करून की, शिक्षण मोठं…अक्कल नाय…” यानंतर अक्षरा सासूला सडेतोड उत्तर देत म्हणते, “अक्कलही महत्त्वाची पण, त्याला शिक्षणाची जोड हवी. अधिपतींची शपथ…पुढच्या दोन महिन्यांच्या आत आमच्या नात्याची गुढी, आपल्या सूर्यवंशींच्या घरात उभी करून दाखवेन.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेचा महाएपिसोड गुढीपाडव्याला म्हणजेच रविवारी ३० मार्चला सायंकाळी ४ वाजता प्रसारित केला जाणार आहे. दरम्यान, शिवानी रांगोळे, हृषिकेश शेलार आणि कविता मेढेकर यांनी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.