‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका काही महिन्यांपूर्वी ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू झाली. या मालिकेत अभिनेत्री शिवानी रांगोळे ‘अक्षरा’ची, तर अभिनेता ऋषिकेश शेलार प्रमुख ‘अधिपती’ची भूमिका साकारत आहेत. अक्षरा आणि अधिपतीची जोडी प्रेक्षकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे. लवकरच मालिकेत या दोघांचा साखरपुडा संपन्न होणार आहे.

हेही वाचा : हास्यजत्रेच्या कलाकारांनी प्राजक्ता माळीला दिलं खास गिफ्ट; अभिनेत्री फार्महाऊसवर ‘अशी’ जपून ठेवणार आठवण

अक्षरा आणि अधिपती यांचा साखरपुडा सोहळा प्रेक्षकांना येत्या ४ सप्टेंबरपासून पाहता येणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. मालिकेतील मुख्य अभिनेत्री अक्षरा शाळेच्या वर्गात गेल्यावर तेथील मुली तिचं आनंदाने स्वागत करतात. त्यानंतर तिला मोठ्या फळ्यावर साखरपुडा सोहळा लिहिल्याचे दिसते असे या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे.

हेही वाचा : “…तर माझ्या आयुष्यातली सगळी माणसं उद्ध्वस्त होतील”, ‘रंग माझा वेगळा’ फेम विदिशा म्हसकर असं का म्हणाली?

अक्षरा आणि अधिपतीच्या साखरपुड्याचे खास क्षण कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अक्षराने लाल काठाची पांढरी साडी नेसली असून त्यावर लाल रंगाच्या बांगड्या, लांब हार, नथ, कमरपट्टा असा लूक केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अधिपतीनेही अक्षराला मॅचिंग अशी शेरवानी घातल्याचे मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : विकी कौशल दिसणार संभाजी महाराजांच्या भूमिकेत?

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री शिवानी रांगोळेने गेल्यावर्षी ३ मे रोजी विराजस कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली. खऱ्या आयुष्यात शिवानीचा साध्या पद्धतीने साखरपुडा झाला होता. परंतु, रिल आयुष्यात अभिनेत्रीचा साखरपुडा धुमधडाक्यात संपन्न होणार आहे.