‘तुला शिकवीन चांगलाच धडा'(Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका सध्या नवीन वळण घेताना दिसत आहे. भुवनेश्वरी व अक्षरा यांच्यातील वाद सध्या टोकाला गेले आहेत. त्या दोघींतील भांडणामुळे अक्षरा-अधिपती यांच्या नात्यातदेखील दुरावा आल्याचे दिसत आहे. अक्षरा घर सोडून माहेरी निघून गेली आहे. महत्वाचे म्हणजे ज्यावेळी अक्षरा घर सोडत होती, त्यावेळी अधिपतीने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. आता भुवनेश्वरी व अक्षरा यांच्यामध्ये पुन्हा एकदा मोठे भांडण झाल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

तुम्ही मालकीण जरी असला…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये भुवनेश्वरी व अक्षरा शाळेच्या ऑफिसमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. त्या दोघींमध्ये कडाक्याचे भांडण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. भुवनेश्वरी अक्षराला शाळेचे नाव भुवनेश्वरी विद्या मंदीर असे वाचून दाखवते. अक्षरा तिला म्हणते, “शाळेला तुमचं नाव आहे म्हणून मला काढून टाकण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही मालकीण जरी असला, तरी तुमच्यापेक्षा कायदेशीर हक्क माझा आहे. अधिपतींची बायको म्हणून, सूर्यवंशींची सून म्हणून. त्यानंतर भुवनेश्वरी अक्षरावर हात उगारते मात्र अक्षरा तिला अडवते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “अक्षरा भुवनेश्वरीला भिडणार”, अशी कॅप्शन दिली आहे.

तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत दाखविल्याप्रमाणे, भुवनेश्वरीने चारूहासबरोबर लग्न करण्यासाठी चारूलताचे रूप घेतले होते. अनेक दिवस ती घरात चारूलताच म्हणून वावरत होती. घरातील सर्वांना ती चारूलता असल्याचे खरेदेखील वाटले. सर्वांनी त्यावर विश्वास ठेवला. अक्षरानेच चारूलता व चारूहास यांचे लग्न लावून देण्याचे ठरवले. मात्र, शेवटी चारूलताच भुवनेश्वरी असल्याचे तिला समजले. तिने घरच्यांना हे सर्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तिच्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. भुवनेश्वरीने तिला वेडे ठरवले. मात्र, शेवटी अक्षरा भुवनेश्वरीच चारूलताचे रूप घेऊन आल्याचे सिद्ध केले. महत्वाचे म्हणजे, भुवनेश्वरीचा हा प्लॅन अधिपतीला माहित होता. भुवनेश्वरी खोटे वागत असून मी त्या घरात राहू शकत नाही, असे अक्षराचे म्हणणे आहे. तर अधिपतीला त्याच्या आईचे म्हणजेच भुवनेश्वरीचे सर्व म्हणणे पटते. त्यामुळे अक्षरा व त्याच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: फिल्टरपाड्याचा बच्चन हिंदी सिनेमात झळकणार! गौरव मोरेने शेअर केलं पहिलं पोस्टर; म्हणाला, “आशीर्वाद…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आता अक्षरा पुढे काय करणार, अधिपती व तिच्यातील अंतर कधी कमी होणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.